कोलकाता - रोजगारांचे प्रमाण कमी झाले असताना सरकारी कोल इंडिया कंपनीने यंदा नोकऱ्यांचे प्रमाण वाढविले आहे. कोल इंडियामध्ये सुमारे ७ हजार जागा भरण्यात येणार आहे.
कोल इंडिया ही जगातील सर्वात मोठी कोळसा उत्खनन करणारी कंपनी आहे. खाणकाम हे अधिक आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावणस्नेही होत असताना कार्यकारी अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढले आहे. कोल इंडिया ही २ हजार कार्यकारी अधिकाऱ्यांना अंतर्गत बढतीच्या प्रक्रियेतून सेवेत घेणार आहे. बढतीमधील अनेक कायदेशीर अडथळे दूर करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. कोल इंडियामध्ये दरवर्षी ६ हजार जागा भरण्यात येतात. यंदा हे प्रमाण वाढविल्याचे कंपनीमधील सूत्राने सांगितले आहे.
हेही वाचा-डिजीटल मीडियाने खासगी शिक्षकांना 'अच्छे दिन''; नोकऱ्यांच्या संख्येत ४० टक्के वाढ
कोल इंडियाच्या ८ उपकंपन्या आहेत. कंपनीमधून दरवर्षी सरासरी १ हजार अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यात येते. मात्र यंदा नव्याने २ हजार अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
नवीन २ हजार कार्यकारी अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यात येणार आहे. त्यापैकी ४०० जणांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अंतर्गत बढतीद्वारे २ हजार लोकांना कार्यकारी पदावर घेतले जाणार आहे. दरवर्षी ५ हजार कार्यकारी अधिकाऱ्यांची उपकंपन्यांकडून थेट निवड केली जाते. यंदाही ही निवड केली जाणार आहे.
हेही वाचा-दूरसंचार, वाहन उद्योग आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत घट
केंद्र सरकारने खाण उद्योगात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणूक करण्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे कोळसा क्षेत्रातही व्यवसायिक पद्धतीने खाणकाम केले जाणार आहे. येत्या ३ ते ४ वर्षात मनुष्यबळ दुप्पट करण्याचे कोल इंडियाने उद्दिष्ट निश्चित केले आहे.
हेही वाचा- 'ही' बहुराष्ट्रीय कंपनी भारतात २ हजार जणांना देणार नोकऱ्या