ETV Bharat / business

११० कोटींची फसवणूक; मारुतीच्या माजी एमडीविरोधात सीबीआयकडून गुन्हा - carnation Auto India

जगदीश खट्टर आणि त्यांची कंपनी कारनेशन ऑटो इंडिया कंपनीमुळे पंजाब नॅशनल बँकेचे ११० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  खट्टर आणि त्यांच्या कंपनीसमेवत काही अज्ञात व्यक्तींचे नाव आरोपपत्रात आहे.

Maruti Suzuki
मारुती सुझुकी
author img

By

Published : Dec 24, 2019, 4:09 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वशेषण विभागाने (सीबीआय) मारुती उद्योगाचे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी ११० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा सीबीआयने दावा केला आहे.

जगदीश खट्टर आणि त्यांची कंपनी कारनॅशन ऑटो इंडिया कंपनीमुळे पंजाब नॅशनल बँकेचे ११० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. खट्टर आणि त्यांच्या कंपनीसमेवत काही अज्ञात व्यक्तींचे नाव आरोपपत्रात आहे. याबाबत पंजाब नॅशनल बँकेने तक्रार केली होती.

हेही वाचा-एअरटेल वाय-फाय कॉलिंगची सेवा मुंबईसह चार राज्यात सुरू; 'हे' आहे वैशिष्टय

खट्टर यांनी मारुती उद्योग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून १९९३ ते २००७ पर्यंत काम केले आहे. निवृत्तीनंतर दोन वर्षांनी खट्टर यांनी कारनेशन ही कंपनी सुरू केली. या कंपनीला २००९ मध्ये १७० कोटी रुपयांचे कर्ज मिळाले. हे कर्ज २०१५ मध्ये पंजाब नॅशनल बँकेने बुडित कर्ज म्हणून घोषित केले.

दरम्यान, सध्याची मारुती सुझुकी ही मारुती उद्योग म्हणून ओळखली जात होती.

पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीने सुमारे १४ हजार कोटींची फसवणूक केली होती. त्यानंतर पीएनबीच्या फसवणुकीचे प्रकरण सातत्याने समोर येत आहेत.

हेही वाचा-कंपनी व्यवहार मंत्रालयाची एनसीएलएटीमध्ये धाव; 'तो' शब्द वगळण्याची विनंती

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.