नवी दिल्ली - कोरोना लशीबाबत अफवा पसरलेल्या असताना आणखी नवीन मुद्दा चर्चेत आला आहे. कोव्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी गायीच्या वासराचे सीरम (रक्त) वापरल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. कोव्हॅक्सिनच्या निर्मितीत वासराच्या सीरमचा वापर केल्याचा काही जणांनी दावा केला आहे. मात्र, हे दावे आरोग्य मंत्रालयाने फेटाळले आहेत.
कोरोना लशीत गाय किंवा अन्य कोणत्याही जनावराच्या सीरमचा वापर केल्याच्या अफवांना आरोग्य मंत्रालयाने पूर्णविराम दिला आहे. कोरोना लशीत नवजात वासराच्या सीरमचा वापर होत नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-चिंता नको! ईपीएफओकडून पीएफ खाते आधारला लिंक करण्याकरिता मुदतवाढ
शेवटच्या टप्प्यात वासराच्या सीरमचा वापर नाही!
शेवटच्या टप्प्यात तयार झालेल्या कोव्हॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचे सीरम नसते. तसेच कोरोना लशीच्या उत्पादनातील अंतिम टप्प्यात वापरण्यात येणाऱ्या साहित्यातही वासराच्या सीरमचा वापर नसतो. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार वासराच्या सीरमच्या वापराबाबत विपर्यास करण्यात आला आहे.
हेही वाचा-सराफांना हॉलमार्किंग सक्तीच्या करण्यात सरकार एक पाऊल मागे; 'अशी' होणार अंमलबजावणी
वासराच्या सीरमचा वापर कशासाठी होतो वापर?
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार वासराच्या सीरमचा वापर केवळ वीरो सेल्सचा विकास आणि त्याच्या तयारीसाठी करण्यात येतो. वीरो सेल्सच्या विकासासाठी जगभरात विविध जनावरांच्या सीरमचे प्रयोग केले जातात. पेशीसमुहांचे आयुष्य वाढविण्यासाटी वीरो सेल्सचा वापर करण्यात येतो. याच पद्धतीने पोलियो, रेबीज आणि इन्फ्लूएन्झाच्या लशीची निर्मिती केली जाते.
हेही वाचा-महामारीतही देशाच्या आर्थिक संपत्तीत ११ टक्क्यांची वाढ; ३.४ लाख कोटी डॉलरची नोंद
12 महिन्यात नऊ संशोधन प्रकाशित -
भारत बायोटेकने नुकतेच म्हटले आहे की, भारताच्या नियामकांनी कोवॅक्सिन लसीच्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण डेटाचा आणि तिसर्या टप्प्यातील आंशिक डेटाचा काळजीपूर्वक आढावा घेतला आहे. कंपनीने कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेच्या आणि प्रभावीपणाबद्दलच्या पाच जागतिक स्तरावर नामांकित सर्वोत्तम पुनरावलोकन जर्नल्समध्ये गेल्या 12 महिन्यांत नऊ संशोधन आधीच प्रकाशित केले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन ही एकमेव पूर्णपणे कोरोनावरील लस आहे जिने भारतात मानवी चाचणी केल्याचा डाटा प्रकाशित केला आहे.
कंपनीने म्हटले आहे, की भारत बायोटेक ने तीन प्रीक्लीनिकल अभ्यास केले आहेत जे 'सेलप्रेस' या अग्रगण्य समीक्षा जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले. कोव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिक्षण आघाडीच्या समीक्षा जर्नल द लान्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आले.
लस विक्रीवर सरकारी संस्थांना रॉयल्टी-
भारत बायोटेकने स्वत: जोखीम घेत उत्पादन व वैद्यकीय चाचण्या ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आयसीएमआरने टेस्ट किट्स, प्राण्यांवरील अभ्यास आदींसाठी भारत बायोटेकला मदत केली आहे. त्याबदल्यात कंपनीकडून लस विक्रीवरून मिळणाऱ्या उत्पन्नातून राष्ट्रीय विषाणू संस्था आणि आयसीएमआरला रॉयल्टी दिले जाते.