ETV Bharat / business

बीएमडब्ल्यूचेही येणार इलेक्ट्रिक मॉडेल; चालू वर्षात आय फोर होणार लाँच - BMW i4 Features

बीएमडब्ल्यू आय फोर ही खऱ्या अर्थाने बीएमडब्ल्यू आहे. हे मॉडेल पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याचे बीएमडब्ल्यूच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य पीटर नोटा यांनी सांगितले.

BMW
बीएमब्ल्यू इलेक्ट्रिक मॉडेल
author img

By

Published : Mar 19, 2021, 3:32 PM IST

म्युनीच - आलिशान कारसाठी प्रसिद्ध असलेल्या बीएमडब्ल्यूही इलेक्ट्रिक वाहन लाँच करणार आहे. इतकेच नव्हे तर २५ इलेक्ट्रिफाईड कार २०२५ पर्यंत लाँच करण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. चार दरवाजे असलेल्या मॉडेलची बाह्यरचना पहिल्यांदाच कंपनीने शेअर केली आहे. बीएमडब्ल्यू आय४ मॉडेल हे कंपनी चालू वर्षात विविध श्रेणीमध्ये उपलब्ध करणार आहे.

बीएमडब्ल्यू आय४मध्ये पावर ही ३९० केडब्ल्यू/५३० एचपी आहे. तर अॅसीलीरेटरची क्षमता चार सेकेदांत शून्य ते १०० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. मॉडेलचा लूक स्पोर्टी, ड्रायव्हिंगमध्ये दर्जेदार आणि उत्सर्जन शून्य आहे. बीएमडब्ल्यू आय फोर ही खऱ्या अर्थाने बीएमडब्ल्यू आहे. हे मॉडेल पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याचे बीएमडब्ल्यूच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य पीटर नोटा यांनी सांगितले.

हेही वाचा-डिजीटल व्यवहाराचे प्रमाण वाढून ६७ टक्के-स्टेट बँकेचे चेअरमन

बीएमडब्ल्यू आय४ विषयी सविस्तर माहिती पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. देशात इलॉन मस्क यांची मालकी असलेल्या टेस्लाहीदेखील इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत आहे. बीएमडब्ल्यूने आय ड्राईव्ह ऑपरेटिंग सिस्टिम ८चे व्हर्जन लाँच करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये नवीन डॅशबोर्ड आणि व्हिझ्यूल डिझाईन आहे.

हेही वाचा-लशीचे दुष्परिणाम झाल्यास आरोग्य विमा योजनेतून उपचार शक्य-आयआरडीएआय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.