नवी दिल्ली - बीएमडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष आणि सीईओ रुद्रतेज सिंह यांनी आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने कॉर्पोरेट जगतावर शोककळा पसरली आहे.
रुद्रतेज यांना रुडी या नावाने ओळखले जात होते. ते बीएमडीडब्ल्यू इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झालेले पहिले भारतीय होते. त्यांना स्वयंचलित आणि बिगर स्वयंचलित उद्योगात २५ वर्षांहून अधिक अनुभव होता. यापूर्वी त्यांनी रॉयल इन्फील्डचे जागतिक अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी युनिलिव्हरसाठीही काम केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना १६ वर्षांचा अनुभव होता.
हेही वाचा-टाळेबंदीचा फटका ; एअर आशियाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्क्यापर्यंत कपात
कोरोनाच्या संकटात मजुरांना दिलासा देण्याकरता रुद्रतेज यांनी बीएमडब्ल्यू इंडियाच्यावतीने 'फीडमायनोयडा' हा उपक्रम एप्रिलमध्ये सुरू केला होता. यामधून मजुरांना सात दिवसात २ लाख जेवणाची थाळी देण्यात आली होती.
हेही वाचा-भारताच्या नव्या एफडीआय नियमाने चीनचा तिळपापड; ही' दिली प्रतिक्रिया