नवी दिल्ली - जैवतंत्रज्ञान कंपनी बायोकॉनच्या सायटोसॉर्ब या वैद्यकीय उपकरणाचा कोरोना रुग्णासाठी वापर करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनामुळे अतिगंभीर असलेल्या रुग्णाचे अवयव निकामी होण्यापासून वाचविण्यासाठी या वैद्यकीय उपकरणाचा वापर करण्यात येणार आहे.
बायकॉन बायॉलॉजी कंपनी रक्तशुद्धीकरणाचे सायटोसॉर्ब उपकरण विकसित केले आहे. हे यापूर्वी इतर रोगांमध्ये वापरण्यात येत होते. या उपकरणाला औषधी नियंत्रक संचालनालयाने (डीसीजीआय) परवानगी दिली आहे.
हेही वाचा-सोने खरेदीकडे का असतो महिलांचा कल?; जागतिक सोने परिषदेने हे दिले उत्तर
याचा वापर आपत्कालीन काळात केवळ १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या रुग्णावर करण्यात येणार आहे. उद्योग आणि नियमन करणाऱ्या संस्था रुग्ण आणि डॉक्टरांना उपचारासाठी दिलासा देवू शकतात, असे बायकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मझुमदार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-टाळेबंदीत बेरोजगारीचे प्रमाण २४ टक्क्यांहून अधिक - सीएमआयई अहवाल