नवी दिल्ली- भारती एअरटेलला तिसऱ्या तिमाहीत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १ हजार ३५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ८६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
भारती एअरटेल कंपनीला तोटा झाला असला तरी महसूल ८.५ टक्क्यांनी वाढून २१,९४७ कोटी रुपये झाला. तर गेल्या आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये कंपनीने २०,२३१ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. डिसेंबर २०१९ मध्ये दर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उद्योगाच्या आर्थिक सुधारणेसाठी स्वागातार्ह निर्णय आहे. उद्योगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी दर बदलले पाहिजेत, यावर विश्वास असल्याचे भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले.
हेही वाचा-'कॉर्पोरेट क्षेत्राला प्रोत्साहन हा अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा मुख्य मार्ग'
भारती एअरटेलला चालू आर्थिक वर्षात २३ हजार ४५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. दूरसंचार विभागाचे थकित शुल्क २८ हजार ४५० कोटी रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने भारती एअरटेलला ऑक्टोबर २०१९ मध्ये आदेश दिले होते. त्यानंतर कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक ९१७ अंशांनी वधारला; सोन्याच्या दरात घसरण