ETV Bharat / business

बँकांकडे पुरेशी चलनाची तरलता उपलब्ध आहे - एसबीआय चेअरमन

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन राजेश कुमार म्हणाले,  जागतिक अर्थव्यवस्था समस्येला तोंड देताना भारत हा त्या व्यवस्थेचा भाग आहे. आपण परिणामापासून दूर राहू शकत नाही

स्टेट बँक ऑफ इंडिया
author img

By

Published : Aug 25, 2019, 12:32 PM IST

गुवाहाटी - बँकांकडे चलनाची पुरेशी तरलता उपलब्ध आहे. बँकांनी अर्थव्यवस्थेत कर्जाचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे मत स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन राजेश कुमार यांनी व्यक्त केले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन राजेश कुमार म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्था समस्येला तोंड देताना भारत हा त्या व्यवस्थेचा भाग आहे. आपण परिणामापासून दूर राहू शकत नाही. अॅग्रीगेटर मॉडेल सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. लोक ओला व उबेरसारखे अॅप वाहतुकीसाठी वापरतात. लोकांनी वाहनांच्या मालकीबाबत दृष्टीकोन बदलला आहे. हा जगभरात बदल होताना भारत हा अपवाद नाही.

सध्या विकासदर कमी होत असलेली आकडेवारी ही मंदीचे लक्षण नसल्याचेही त्यांनी सांगितले. आसाम सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्याचे राजेश कुमार यांनी सांगितले. त्यांच्याकडून मूल्यवान प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.