मुंबई - कोरोनाच्या संकटात सरकारला साथ देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी पीएम केअर्सला ५ कोटी रुपये दिले आहेत. त्यासाठी बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने एक दिवसाचे वेतन आणि दोन दिवसांच्या सुट्ट्यांचे मिळणारे पैसे पीएम केअर्सला दिले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पीएम केअर्ससाठी मदतनिधीही स्विकारला जात आहे. पीएम केअर्सच्या नावाने आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, चेक आणि डिमांड ड्राफ्ट देवून मदत स्विकारली जात असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राने म्हटले आहे. पंतप्रधान नागरी सहाय्य आणि आपत्कालीन स्थिती मदतनिधी (पीएम केअर्स फंड) हा मार्च २८ मध्ये स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटाविरोधात लढण्यासाठी आणि नागरिकांना देण्याकरता या मदतनिधीची सुरुवात करण्यात आली आहे.
हेही वाचा-एअर इंडियाची देश-विदेशातील निवडक मार्गांवर 'या' तारखेपासून सुरू होणार सेवा
अनेक कॉर्पोरेट्स, संरक्षण अधिकारी, सरकारी कंपन्यांचे कर्मचारी, खेळाडू, बॉलीवूडचे सेलिब्रिटी यांनी पीएम केअर्स फंडला मदत दिली आहे.
हेही वाचा-व्हेटिंलेटरच्या उत्पादनाकरिता ह्युंदाईची फ्रान्सच्या कंपनीबरोबर भागीदारी