मुंबई - बजाज फिनसर्व्ह कंपनीने कोरोनाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकरिता विस्तारित मदत आणि आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये मुलांना पदीवपर्यंत शिक्षण व कुटुंबाना वैद्यकीय विमा यासारख्या मदतीचा समावेश आहे.
बजाज ग्रुपने कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता मदत जाहीर केली आहे. यामध्ये बजाज फिनसर्व्हने बजाज फायनान्स, बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स, बजाज अलाईन्स जनरल इन्शुरन्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, बजाज फिनसर्व्ह हेल्थ, बजाज फायनान्शियल सिक्युरिटीज, बजाज फिनसर्व्ह मार्केट्स आणि बजाज होल्डिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. ही मदत १ एप्रिल २०२१ पासून उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटीचे रक्तचंदन पोलिसांनी पकडले, आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस
कर्मचारी म्हणजे बजाज कुटुंबाचा भाग
बजाज फिनसर्व्हचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज म्हणाले, की आमचे लोक केवळ कर्मचारी नाहीत. तर मोठ्या बजाज कुटुंबाचा भाग आहेत. महामारीमुळे आम्ही काही आमच्या लोकांचे प्राण गमाविले आहेत. अशा कठीण काळात आम्ही या कुटुंबाच्या पाठिशी आहोत.
हेही वाचा-हाय व्होल्टेज ड्रामा : नारदा घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या टीएमसीच्या नेत्यांना जामीन मंजूर
अशी मिळणार कर्मचाऱ्यांना मदत
- मृत कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनाच्या १.५ ते ३ पट आर्थिक मदत कुटुंबाला करण्यात येणार आहे.
- तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना १ कोटी इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
- या कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांपर्यंतचे पदवीपर्यंतचे शिक्षण होईपर्यंत कंपनीकडून आर्थिक मदत केली जाणार आहे.
- या कुटुंबाला ६० महिन्यांचा वैद्यकीय विमा दिला जाणार आहे.
- कर्मचाऱ्याच्या पत्नीला कन्सल्टंट म्हणून रोजगार दिला जाणार आहे.