ETV Bharat / business

भांडवली मूल्य 2 लाख कोटी डॉलर असलेली अ‌ॅपल ठरली अमेरिकेची पहिली कंपनी - Latest Apple news

कोरोना महामारीत अ‌ॅपल कंपनीने चीनमधील आयफोन व रिटेल व्यवसाय बंद केला आहे. असे असले तरी कंपनीचे शेअर चालू वर्षात सुमारे 60 टक्क्यांनी वाढले आहेत.

संग्रहित - अॅपल
संग्रहित - अॅपल
author img

By

Published : Aug 20, 2020, 5:13 PM IST

वॉशिंग्टन – अ‌ॅपलचे भांडवली मूल्य केवळ दोन वर्षांत 2 लाख कोटी डॉलर झाले आहे. एवढे भांडवल मूल्य असलेली अ‌ॅपल ही अमेरिकेची पहिली कंपनी ठरली आहे. यापूर्वीच अ‌ॅपल ही जगात सर्वाधिक भांडवली मूल्य असलेली कंपनी ठरली आहे.

कोरोना महामारीत अ‌ॅपल कंपनीने चीनमधील आयफोन व रिटेल व्यवसाय बंद केला आहे. असे असले तरी कंपनीचे शेअर चालू वर्षात सुमारे 60 टक्क्यांनी वाढले आहेत.

अ‌ॅपल कंपनीचे ग्राहक खूप एकनिष्ठ असतात. ते सातत्याने आयफोनसह इतर उत्पादनांची विश्वासाने खरेदी करतात. कंपनीने एप्रिल-जूनच्या तिमाहीत चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. कंपनीने चार शेअरवर एक शेअर देवू केल्याने कंपनीच्या शेअरला गुंतवणूकदारांनी चांगली पसंती दर्शविली. त्यामुळे तीन आठवड्यांपासून अ‌ॅपलचे शेअरचे दर वधारले आहेत.

जगात काही थोड्याच कंपन्या लोकांच्या जीवनमान आणि शेअर बाजारावर मोठा परिणाम करतात. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, अ‌‌मेझॉन, फेसबुक, गुगलची पालक कंपनीसह अ‌ॅपलचा समावेश आहे. या कंपन्यांचा अमेरिकेच्या एस अँड पी 500 मध्ये सूचीबद्ध असलेल्या एकूण कंपन्यांच्या भांडवली मूल्यात 23 टक्के हिस्सा आहे.

सौदी अरेम्को कंपनीचे भांडवली मूल्य डिसेंबर 2019 मध्ये 2 लाख कोटी डॉलर झाले होते. मात्र, खनिज तेलाच्या किंमती घसरल्यानंतर सौदीच्या कंपनीच्या शेअर दरामध्ये घसरण झाली आहे. सध्या सौदी अरेम्कोचे भांडवली मूल्य हे 1.82 लाख कोटी डॉलर आहे. अ‌ॅपल कंपनीचे दोन वर्षांपूर्वी भांडवली मूल्य हे पहिल्यांदा 1 लाख कोटी डॉलर झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.