नवी दिल्ली - दुधाच्या भुकटीच्या आयातीवरील शुल्क माफ करण्याच्या प्रस्तावाला अमूलने विरोध केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दूध उत्पादकांचे नुकसान होईल, असे अमूलने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमफ) ही अमूल ब्रँडच्या नावाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची बाजारात विक्री करते. या संस्थेने दुधाची भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याच्या सीआयआयच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. भारतीय उद्योग महासंघाने (सीआआय) दुधाच्या भुकटीवरील शुल्क माफ करण्याचा सरकारला केलेला प्रस्ताव हा आश्चर्यकारक आहे. हा प्रस्ताव ५० हजार टन एवढ्या प्रचंड भुकटीसाठी असल्याचे अमुलचे व्यवस्थापकीय संचालक एस. आर. सोधी यांनी अन्नप्रक्रिया मंत्रालयाचे सचिव पुषा सुब्रमण्यम यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-र्थव्यवस्थेचे 'गुलाबी चित्र' धूसर; आयएमएफकडून चालू वर्षात ४.८ टक्के जीडीपीचा अंदाज
कोणत्याही प्रमाणात दुधाची भुकटी आयात केली तर देशातील दूध उत्पादकांवर कमी आणि दीर्घ कालावधीसाठी अपायकारक ठरणार आहे. देशात दुधाचा तुटवडा असल्याची खासगी व्यावसायिकांनी व आईस्क्रीम उत्पादकांनी व्यक्त केलेली भीती ही त्यांच्या स्वार्थासाठी आहे. त्यांना स्वस्तामधील कच्च्या माल हवा आहे. त्यामध्ये शेतकरी आणि ग्राहकांचे हित नाही, असे सोधी यांनी पत्रात म्हटले आहे. उद्योग संघटनांच्या मागणीपुढे सरकारने झुकू नये, अशी अमूलने अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या बाजारात दुधाच्या भुकटीचा २८० ते ३०० रुपये प्रति किलो भाव आहे. हा दर २०१४ पासून स्थिर आहे.
हेही वाचा-कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या वापरावर सुंदर पिचाईंचे मोठे विधान, म्हणाले...