बंगळुरू – स्थानिक व्यापाऱ्यांना सक्षम करण्याकरता अॅमेझॉन पेने स्मार्ट स्टोअर हे फीचर सुरू केले आहे. त्यासाठी ग्राहकांना अॅमेझॉन अॅपचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन करावे लागणार आहे. स्मार्ट स्टोअरमुळे विक्रेत्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी मदत होणार आहे. तसेच ग्राहकांना चांगला अनुभव मिळू शकणार आहे.
अॅमेझॉन पेचे सीईओ महेंद्र नेरुरकर म्हणाले, की दहा लाखांहून अधिक दुकानांमध्ये अॅमझॉनचा वापर करण्यात येतो. नव्या फीचरमुळे स्थानिक दुकानदारांना अॅप अधिक सुरक्षित आणि सोपे होणार आहे.
ग्राहकाला क्रेडिट अथवा डेबिट कार्डचाही पर्याय निवडता येणार आहे. ग्राहक त्यांचे व्यवहार ईमआयमध्ये बदलू शकतो. त्यामधून ग्राहकाला बँकेकेडून देण्यात येणारे रिवार्ड्स अपवर मिळणार आहेत. स्मार्ट स्टोअरमधून विक्रेत्याला डिजीटल स्टोअरही सुरू करता येणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना स्थानिक उत्पादने पाहणे, त्यावरील प्रतिक्रिया वाचता येणार आहेत.
ग्राहकाला आकर्षित करण्याकरता अॅपमधून रिवार्डही देता येणार आहेत. ईएमआय, बँकेकडून मिळणाऱ्या ऑफर आणि रिवार्ड यामधून खरेदी परवडणाऱ्या दरात करण्याचा प्रयत्न असल्याचे नेरुरकर यांनी सांगितले. त्यामधून दुकानदारांना व्यवसाय वाढविण्यासाठी मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.