नवी दिल्ली - एअरटेल कंपनीने दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलिंगसाठी शुल्क लागू केले होते. हे शुल्क रद्द करून पुन्हा आउटगोईंग मोफत केले आहे.
एअरटेलने ३ डिसेंबरला रिचार्जचे नवे प्लॅन जाहीर केले होते. त्यामध्ये २८ दिवसांची मुदत असलेल्या रिचार्जवर दुसऱ्या नेटवर्कवर १ हजार मिनिटेच मोफत बोलता येणार होते. याशिवाय इतर रिचार्ज प्लॅनवरही आउटगोईंगची मर्यादा घालून दिलेली होती. ही मर्यादा संपल्यानंतर प्रति मिनिटाला ६ पैसे आकारण्यात येत होते. कंपनीने रिचार्ज दरात ५० टक्के वाढ लागू केली आहे. दुसऱ्या नेटवर्कवर अमर्यादित प्लॅनवरून अर्मयादित बोलता येणार आहे. त्यासाठी कोणतीही अट नसल्याचे भारती एअरटेलने शुक्रवारी ट्विट केले.
-
We heard you! And we are making the change.
— airtel India (@airtelindia) December 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
From tomorrow, enjoy unlimited calling to any network in India with all our unlimited plans.
No conditions apply. pic.twitter.com/k0CueSx0LV
">We heard you! And we are making the change.
— airtel India (@airtelindia) December 6, 2019
From tomorrow, enjoy unlimited calling to any network in India with all our unlimited plans.
No conditions apply. pic.twitter.com/k0CueSx0LVWe heard you! And we are making the change.
— airtel India (@airtelindia) December 6, 2019
From tomorrow, enjoy unlimited calling to any network in India with all our unlimited plans.
No conditions apply. pic.twitter.com/k0CueSx0LV
हेही वाचा - कांद्याच्या भाववाढीने पर्यटकांच्या संख्येत घट; गोव्याच्या मंत्र्यांचा दावा
भारती एअरटेलने आउटगोईंगचे दर रद्द केल्याने एअरटेलचा ३९९ चा प्लॅन हा रिलायन्स जिओहून अधिक स्वस्त झाला आहे. भारती एअरटेलला दुसऱ्या तिमाहीत सुमारे २३ हजार ४५ कोटींचा तोटा झाला. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दूरसंचार कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्या २८ हजार ४५० कोटी रुपयाच्या रकमेचा समावेश आहे.