सॅन फ्रान्सिस्को - चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवसायाला फटका बसत आहे. चालू तिमाहीत कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम होणार असल्याचे मायकोसॉफ्टने म्हटले आहे.
अपेक्षेप्रमाणे व्हिन्डोजला चांगली मागणी आहे. मात्र, पुरवठा साखळी पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. मार्च तिमाहीतील अंदाजित महसूल मिळू शकणार नसल्याचे अॅपलने नुकतेच म्हटले आहे. तसेच जगभरात अॅपलच्या होणाऱ्या वितरणावरही परिणाम होणार असल्याचे कंपनीने म्हटले होते.
हेही वाचा-अॅपल भारतात पहिले 'फ्लॅगशिप स्टोअर' २०२१ मध्ये सुरू करणार - टिम कूक
अॅपलला दुसऱ्या तिमाहीत ६३ अब्ज डॉलर ते ६७ अब्ज डॉलर महसूल मिळेल अशी अपेक्षा होती. अॅपलच्या उत्पादनात भागीदारी असलेले चीनमधील उद्योग कोरोनामुळे बंद आहेत.
हेही वाचा-चिनी स्मार्टफोन कंपनी वापरणार इस्रोचे 'हे' तंत्रज्ञान