डल्लास (अमेरिका) - अदानी ग्रीन एनर्जी (एजीएएल) कंपनीला कोरोना महामारीच्या संकटादेखील मोठे व्यावसायिक यश मिळाले आहे.भारतीय सौर ऊर्जा महामंडळाचे (SECI) अदानी कंपनीला कंत्राट मिळाले आहे. हे सहा अब्ज डॉलरचे कंत्राट आहे.
एजीएएल कंपनी ही 8 गिगावॅटचे सौर प्रकल्प बांधणार आहे. तर अतिरिक्त दोन गिगावॅटचे सौर सेल बसविणार आहे. यामधून 4 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याची अपेक्षा करण्यात येत आहे.
हे जगातील सर्वात मोठे सौर कंत्राट आहे. एजीएएल कंपनी 2025 पर्यंत सौर ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये पॅरिसमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेत भारत हा क्रांती घडवेल असे म्हटले होते.