मुंबई - देशामधील ७० ते ९० टक्के नागरिकांमध्ये 'ड' जीवनसत्वाची कमतरता असल्याचे अभ्यासामधून माहिती समोर आली आहे. 'ड' जीवनसत्वाची कमतरता असल्याने मधुमेह आणि रक्तदाब होण्याचा त्यांना अधिक धोका असतो, असे अभ्यासात म्हटले आहे.
सुर्यापासून मिळणाऱ्या 'ड' जीवनसत्वाची कमतरता असल्याचे लहान मुलांच्या हाडांच्या विकासावर परिणाम होतो. तसेच प्रौढांमधील हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हा अभ्यास मधुमेहतज्ज्ञ पी.जी.तळवलकर, वैशाली देशमुख, एम.सी.दीपक आणि दिनेश अग्रवाल यांनी केला. ड जीवनसत्वाची कमतरता असल्याने दुर्धर रोग होतात. यामध्ये मधुमेह, रक्तदाब आणि छातीचे विकार होतात.
या बाबी अभ्यासात आल्या आढळून-
क्रमांक २ प्रकारचा मधुमेह असलेल्या ८४.२ टक्के रुग्णांमध्ये 'ड' जीवनसत्वाची कमतरता असल्याचे आढळून आले. तर रक्तदाब असलेल्या ८२.६ टक्के रुग्णामध्ये 'ड' जीवनसत्वाची कमतरता असल्याचे दिसून आले. देशाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागामध्ये 'ड' जीवनसत्वाचे प्रमाण कमी असण्यामध्ये फारसा फरक दिसून आलेला नाही. उत्तरेकडे ८८ टक्के, दक्षिणेमध्ये ९० टक्के, पूर्वेमध्ये ९३ टक्के आणि पश्चिमेमधील ९१ टक्के लोकात जीवनसत्वाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे.
गर्भवती महिलेमध्ये ८४ टक्के 'ड' जीवनसत्वाची कमतरता असते. याचा परिणाम नवजात अर्भकामध्येही 'ड' जीवनसत्ताची कमतरता होती. त्यामुळे त्यांच्या हाडांच्या विकासावर आणि उंचीवर परिणाम होतो, असे अब्बॉट मेडिकलचे संचालक श्रीरुपा दास यांनी सांगितले.