नवी दिल्ली - व्यावसायिक नेटवर्किंग माध्यम लिंक्डइनमध्ये प्रत्येक मिनिटाला तीन जणांना नोकरी मिळते, असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी सांगितले. ते लिंक्डइनच्या पहिल्या तिमाहीमधील आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर करताना बोलत होते. लिंक्डइन ही मायक्रोसॉफ्टच्या मालकीची कंपनी आहे.
लिंक्डइनमध्ये ७२२ दशलक्ष वापरकर्ते असल्याचेही सत्या नाडेला यांनी सांगितले. ते म्हणाले, की अनेक व्यावसायिक हे ज्ञानाचे भांडवल वाढविण्यासाठी लिंक्डइनकडे वळत आहेत. दर आठवड्याला वापरकर्ते लिंक्डइनचा एकूण १० लाख तासांचा वापर करतात. मार्केटिंग करण्याकरता जाहिरातदार हे कोरोनाच्या पूर्वीच्या काळाप्रमाणे लिंक्डइनकडे वळल्याचे नाडेला यांनी सांगिलते.
लिंक्डइनमध्ये सुरू करण्यात आले आहेत नवीन फीचर-
लिंक्डईनमध्ये नवीन संपर्क सोडण्यासाठी आणि कथा (स्टोरी) सामाईक करण्यासाठी नवीन फीचर सुरू करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षात लिंक्डइनमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. लिंक्डइन हे झुम, ब्ल्यूजीन्स, स्नॅपचॅटशी जोडण्यात आले आहे. नुकतेच कंपनीने भारतात स्टोरी हे फीचर सुरू केले आहे. यामध्ये वापरकर्त्याला २० सेकंदापर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ सामाईक करता येतात. ही स्टोरी वापरकर्त्याच्या प्रोफाईलवर २४ तासांसाठी दिसू शकतात. तसेच शोध (सर्च), स्ट्रीमलाईनसाठी नवीन फीचर सुरू केले आहेत.