हैदराबाद - कोरोनाच्या लढ्यात दिलासादायक बातमी आहे. भारतीय औषधी नियामक संस्थेने (डीजीसीआय) झायडस कॅडिलाच्या कावीळवरील औषधाला कोरोनावरील उपचारासाठी मान्यता दिली आहे. झायडस कॅडिलाचे पेगीहेप (पेगिएफएन) हे विषाणुजन्य संसर्गावर प्रभावी ठरल्याचे कॅडिला हेल्थ कंपनीने म्हटले आहे.
कॅडिला हेल्थ कंपनीच्या माहितीनुसार रुग्णांवर उपचार केल्यानंतर 91.15 टक्के रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी ही 7 दिवसात निगेटिव्ह आली आहे. कॅडिला हेल्थकेअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले, की सुरुवातीच्या काळात विषाणुचा संसर्ग कमी होण्याकरता पेगीहेपचे उपचार लक्षणीय उपयोगी ठरले आहेत. कोरोनाच्या लढ्यात अत्यंत गरज असताना आम्ही आणखी चांगल्या थेरपी देणे सुरुच ठेवणार आहोत.
हेही वाचा-नाशिक हॉस्पिटलमध्ये अशी झाली ऑक्सिजन गळती, बघा सीसीटीव्ही व्हिडिओ
औषधामुळे ऑक्सिजनची गरज होते कमी-
पेगएफएन औषधांमुळे कोरोनाबाधित रुग्णाला लागणारा ऑक्सिजनची आवश्यकता कमी होत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. औषधामुळे रुग्णाला लागणारा ऑक्सिजन 84 तासांवरून 56 तास होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रुग्णाला सुरुवातीच्या काळात दिलेला एक डोसही खूप सुधारणा करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पेगएफएन हे यापूर्वी कावीळ बी आणि कावीळ सी प्रकारच्या गंभीर रुग्णांना दिले जात होते.
हेही वाचा-नाशिक हॉस्पिटलमध्ये अशी झाली ऑक्सिजन गळती, बघा सीसीटीव्ही व्हिडिओ
दरम्यान, देशात 16 जानेवारीपासून कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. तर 1 मेपासून 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या सर्वांना लस दिली जामार आहेत.
रुग्णसंख्या वाढीने केला विक्रम-
गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,32,730 नवीन रुग्ण आढळले आहेत. हे वर्षभरात सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद आहे. गेल्या दोन दिवसांपासून रोज 3 लाखांहून कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. देशात सध्या 24,28,616 कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 1,36,48,159 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.