ETV Bharat / business

बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत समाज माध्यमात अफवा; येस बँकेची मुंबई पोलिसात तक्रार

author img

By

Published : Oct 7, 2019, 4:21 PM IST

येस बँकेच्या प्रवर्तकांनी बँकेतील हिस्सा कमी केला आहे. त्यानंतर गेली काही दिवस बँकेच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली आहे. अशा स्थितीत येस बँकेने व्हॉट्सअ‌ॅपसह इतर समाज माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दिली.

संग्रहित- येस बँक

नवी दिल्ली - बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत खोट्या बातम्या आणि अफवा पसरविल्या जात असल्याची येस बँकेने मुंबई पोलिसात आणि सायबर सेलमध्ये तक्रार केली. आर्थिक स्थिती सदृढ आणि सुरक्षित असल्याचे येस बँकेने म्हटले आहे.

येस बँकेच्या प्रवर्तकांनी बँकेतील हिस्सा कमी केला आहे. त्यानंतर गेली काही दिवस बँकेच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली आहे. अशा स्थितीत येस बँकेने व्हॉट्सअ‌ॅपसह इतर समाज माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवाविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे. याची माहिती बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. खोट्या बातम्या शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांचे पथक असावे, अशी विनंतीही बँकेने सायबर सेलला केली आहे.

हेही वाचा-सणासुदीला ग्राहकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात

चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका - बँकेचे आवाहन

गेली काही दिवस उपद्रवी लोकांकडून बँकेबाबत चुकीची माहिती आणि द्वेषयुक्त संदेश समाज माध्यमात पसरविण्यात येत आहेत. यामधून ठेवीदारांच्या मनात चिंता आणि भीती निर्माण होत आहे. समभागधारक, ठेवीदार आणि सर्वसामान्य लोकामधील असलेली बँकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बँक सर्व भागधारकांचे हित जोपासण्यासाठी बांधील आहे. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे बँकेने आवाहन केले आहे.

हेही वाचा-सरकार खासगीकरण करणार असल्याने बीपीसीएलला फटका; शेअरमध्ये ३ टक्के घसरण

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.