ETV Bharat / business

कोरोना महामारीचा महिलांच्या मानसिक आरोग्यासह कामाच्या समाधानावर परिणाम

कोरोना महामारीत महिलांवर घरातील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा नोकरी करणाऱ्या महिलांवर मोठा परिणाम झाल्याचे डेलॉईटच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. या सर्वेक्षणानुसार ५१ टक्के महिलांनी करियरबाबत कमी आशा असल्याचे म्हटले आहे.

author img

By

Published : May 19, 2021, 8:29 PM IST

Indian women
भारतीय महिला

नवी दिल्ली - कोरोना महामारीत कामाची जबाबदारी आणि घरातील काम वाढल्याने महिलांवरील ताणव वाढल्याचे एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल डेलॉईटने 'वूमेन@ वर्क अ ग्लोबल आउटलूक' नावाने प्रसिद्ध केला आहे.

कोरोना महामारीत महिलांवर घरातील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा नोकरी करणाऱ्या महिलांवर मोठा परिणाम झाल्याचे डेलॉईटच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. या सर्वेक्षणानुसार ५१ टक्के महिलांनी करियरबाबत कमी आशा असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा-अदानी ग्रुप 'ही' कंपनी २५,५०० कोटी रुपयांना करणार खरेदी

हे आढळले डेलॉईटच्या सर्वेक्षणात!

  • डेलॉईटने १० देशांमधील ५ हजार महिलांची मते कामाचे समाधान आणि मानसिक स्वास्थ्याबाबत मते जाणून घेतली आहेत. त्यामध्ये देशातील ५०० महिलांचा समावेश होता.
  • देशातील १० पैकी ७ म्हणजे सुमारे ६९ टक्के महिलांनी कोरोनापूर्वीच्या कामाबाबत चांगले अथवा अत्यंत चांगले समाधान व्यक्त केले आहे. मात्र, सध्या केवळ त्याच पद्धतीने २८ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
  • कोरोना महामारीमुळे महिलांना कामाबाबत वाटणारे समाधान कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर १० पैकी ६ म्हणजे ५७ टक्के महिलांनी करियरमध्ये हवी तशी प्रगती होत नसल्याचे म्हटले आहे. तर जगातील सुमारे ४२ टक्के महिलांनी करियरमध्ये हवी तशी प्रगती होत नसल्याचे म्हटले आहे.
  • कोरोनापूर्वीच्या तुलनेत करियरच्या प्रवासाबाबत भारतीय महिला कमी आशावादी असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. देशातील १० पैकी ६ महिलांनी करियरच्या भविष्याबाबत आशादायी असल्याचे सांगितले. तर जगातील ५१ टक्के महिलांनी करियरच्या भविष्याबाबत आशादायी असल्याचे म्हटले आहे.
  • सुमारे २६ टक्के महिलांनी नोकरी सोडण्याचा विचार करत असल्याचे म्हटले. तर जगभरातील २३ टक्के महिलांनी नोकरी सोडण्यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे.
  • देशात कमी प्रमाणात कंपन्या महिलांना कोरोनाच्या काळात संसाधने उपलब्ध करून देत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, महिलांना मातृत्वाची रजा देण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत अधिक आहे.

हेही वाचा-रॉयल एन्फील्डने परत मागविले 'ही' २.३६ लाख वाहने; इग्निशन कॉईल आढळले सदोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.