नवी दिल्ली - चालकविरहीत चारचाकींना देशात परवानगी देण्यात येणार नाही, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केली. ते असोचॅमच्या कार्यक्रमात बोलत होते.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, चालकविरहित चारचाकीबाबत मला अनेकदा विचारण्यात येते. जोपर्यंत मी वाहतूक मंत्री आहे, तोपर्यंत ते तुम्ही विसरा. भारतात चालकविरहित चारचाकीला परवानगी देणार नाही.
देशात २२ लाख चालकांची कमतरता आहे. देशात तसेच उद्योगात रोजगार वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, वाहने भंगारात (स्क्रॅपेज) काढण्याचे धोरण अंतिम टप्प्यात आले आहे. ते धोरण आम्ही आणले तर १०० टक्के खर्च वाचणार आहे. कारण कच्चा माल हा स्वस्त असणार आहे. त्यामुळे भारत हा वाहन निर्मिती आणि ई-वाहनांच्या निर्मितीत हब होणार आहे. जर तसे झाले तर निश्चितच ५ लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेत वाहन उद्योगाचे योगदान ठरणार आहे. वाहन उद्योग हा ४.५ लाख कोटींचा उद्योग असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा -'नियमनातील अनिश्चितताही भारताच्या मंदीला कारण'
दरम्यान, टेस्ला या कंपनीने अमेरिकेत चालकविरहीत चारचाकीची निर्मिती केली आहे.