नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी 'डार्क मोड फीचर' लॉंच केले आहे. अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्हींसाठी 'डार्क मोड फीचर' बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
-
Finally. Dark mode on WhatsApp. #DarkMode pic.twitter.com/o4Ee5H7qpW
— WhatsApp Inc. (@WhatsApp) March 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Finally. Dark mode on WhatsApp. #DarkMode pic.twitter.com/o4Ee5H7qpW
— WhatsApp Inc. (@WhatsApp) March 3, 2020Finally. Dark mode on WhatsApp. #DarkMode pic.twitter.com/o4Ee5H7qpW
— WhatsApp Inc. (@WhatsApp) March 3, 2020
हेही वाचा - मराठमोळा क्रिकेटपटू अजित आगरकरचा पत्ता कट!
व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरसाठी तुम्हाला आधी तुमचे अॅप अपडेट करावे लागेल. यासाठी गुगुल प्ले स्टोअरवर गेल्यावर व्हॉट्सअॅपच्या आयकनसमोर अपडेट नावाचे ऑप्शन तुम्हाला दिसेल. तुमचे व्हॉट्सअॅप आधीच अपडेट असेल तर तुम्हाला हे ऑप्शन दिसणार नाही. त्याऐवजी तुमच्या मोबाईलवर अॅप आधीच इन्स्टॉल असल्याचे दिसून येईल.
व्हॉट्सअॅपचे नवे फिचर 'थीम' या ऑप्शनमध्ये दिसून येईल. त्याची निवड केल्यावर व्हॉट्सअॅपचा रंग पूर्णपणे डार्क होतो. अॅपचा वरील लूक आधीप्रमाणेच हिरव्या रंगाचा ठेवण्यात आला असून चॅट करताना डार्क मोड दिसेल.
अँड्रॉइड १० आणि आयओएस १३ च्या युजर्सना डिव्हाइसच्या सिस्टिम सेटिंग्जमधून हे नवीन फीचर आपल्या व्हॉट्सअॅपवर लागू करता येईल.
'डार्क मोड' फीचर कसे सुरू कराल -
WhatsApp Settings > Chats > Theme > Dark
आवडता वॉलपेपर निवडता येणार नाही -
डार्क मोडमध्ये युजर्सना वॉलपेपर सेट करता येणार नाही. डार्क मोडमध्ये ही सुविधा देण्यात आलेली नाही. डार्क मोड केल्यानंतर तुम्हाला आधीची थीम निवडायची असेल तर लाईट ही थीम निवडता येईल. त्यासाठी WhatsApp Settings > Chats > Theme > Dark हे ऑप्शन निवडावे लागेल.