ETV Bharat / business

तुमच्या व्हॉट्सअॅप 'स्टेट्स'मधून फेसबुक मिळविणार पैसे

author img

By

Published : May 25, 2019, 12:48 PM IST

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना व्हॉट्सअॅपमधून पैसे मिळवायचे आहे, असे सांगत व्हॉट्सअॅपच्या काही सहसंस्थापकांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. या

WhatsApp

सॅन फ्रान्सिस्को - तुम्ही जे व्हॉट्सअॅप स्टेट्स टाकता, त्यातून फेसबुकला पैसे मिळणार आहेत. याबाबतची माहिती व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या फेसबुकनेच दिली आहे. या व्हॉट्सअॅपच्या स्टेट्सवरील जाहिराती पुढील वर्षापासून सुरू होणार आहे.

फेसबुकच्या मार्केटिंगबाबतची वार्षिक बैठक नेदरलँडमध्ये पार पडली. यामध्ये फेसबुकने २०२० मध्ये व्हॉट्सअॅप स्टेट्सवर जाहिराती येणार असल्याची पुष्टी दिली आहे. याबाबतचे ट्विट फेसबुकच्या वार्षिक बैठकीला उपस्थित असलेल्या ओलिव्हिर पॉंटेव्हिले यांनी केले आहे. व्हॉट्सअॅपच्या स्टेट्सवर जाहिराती येणार असल्याचे वृत्त माध्यमांनी ऑक्टोबरमध्ये दिले होते.

काय आहे व्हॉट्सअॅप स्टेट्स फिचर -
व्हॉट्सअॅप स्टेट्समधून वापरकर्त्यांना शब्द, फोटो, व्हिडिओ आणि अॅनिमेटेड जीआयएफ शेअर करता येतात. हे स्टेट्स २४ तासापर्यंत दिसतात.
व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जनमध्ये स्टेट्सवरील जाहिरातीचे काम सुरू आहे. मात्र, ते अद्याप वापरकर्त्यांना दिसून शकत नाही, असे एका माध्यमाने म्हटले आहे. या जाहिराती फेसबुकच्या जाहिरात व्यवस्थेकडून दाखविल्या जाणार आहेत.

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना व्हॉट्सअॅपमधून पैसे मिळवायचे आहे, असे सांगत व्हॉट्सअॅपच्या काही सहसंस्थापकांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. यापैकी एक सहसंस्थापक असलेले ब्रायन अॅक्टन म्हणाले, झुकेरबर्ग यांना व्हॉट्सअॅपमधून पैसे मिळविण्याची घाई होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या इनक्रिप्शन तंत्रज्ञान कमी प्रभावी करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलदरम्यान इस्त्राईच्या कंपनीने बग सोडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे नुकतेच व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना व्हर्जन अपडेट करण्याचे आवाहन दिले होते.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.