नवी दिल्ली - दूरसंचार ऑपरेटर कंपनी व्होडाफोन आयडियाने मुंबईत ४ जी सेवेसाठी ३ स्पेक्ट्रमचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे महानगरामध्ये ग्राहकांना डाटा वेगवान मिळणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे.
व्होडाफोन आयडियाला २१०० मेगाहर्टझ बँडमध्ये ५ मेगाहर्टझ स्पेक्ट्रम मिळाले आहे. त्याचा ग्राहकांना ३ जी सेवा देण्यासाठी वापर केला जातो. सध्याची असलेली ४ जीची पायाभूत सुविधा ही २१०० मेगाहर्टझ लेयरच्या विस्तारासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे व्हीआयच्या (व्होडोफोन आयडिया) ग्राहकांना नेटवर्कचा चांगला अनुभव येणार आहे.
हेही वाचा-मेक इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता सरकारकडून ४० हजार कोटींची कंत्राटे रद्द
ग्राहकांनी जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून ४जीमध्ये सीमकार्ड अद्ययावत करावे, अशी ग्राहकांना विनंती आहे. त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. सीमकार्ड अद्ययावत केल्यानंत वूई गिगानेट ४जीची क्षमता असल्याचे व्होडाफोन आयडियाचे ऑपरेशन्सचे संचालक राजेंद्र चौरासिया यांनी सांगितले. व्होडाफोन ३जी कनेक्शन असलेल्या ग्राहकांना ४जीचा वेगवान स्पीड मिळू शकतो. त्यासाठी ग्राहकांनी ४जी हँडसेट आणि ४जी सिम वापरावे लागते.
हेही वाचा- पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; सरकारी कंपन्यांचे 'थांबा आणि वाट पाहा'चे धोरण
सीमकार्डे रुपांतर ४जीमध्ये केले गेले, तरी २जी वापरकर्त्यांना व्हॉइस कॉलिंगसाठी आणि ३जी वापरकर्त्यांना इंटरनेटसाठी मिळाणाऱ्या सुविधा व फायदे कायम ठेवले जातील. हळूहळू त्यांचा समावेश ४जीमध्ये केला जाईल. कंपनीच्यावतीने आपल्या ग्राहकांना याबाबत संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. आमचे प्रतिनिधी ग्राहकांना याबाबत सर्व माहिती देत आहेत, असेही व्हीआयने सांगितले.