नवी दिल्ली - खाण उद्योगातील कंपनी वेदांत कंपनीने कोरोनाच्या लढ्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. या निधीचा उपयोग मजूर, कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांसाठी करण्यात येणार आहे.
कोरोनाने उद्योगांची कामे ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत वेदांत कंपनी कर्मचारी व कंत्राटी कामगार यांचे वेतन कपात करणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
कोरोनाबरोबर लढण्याकरता सरकारबरोबर वेदांत कंपनी सहभागी होत आहे. त्यासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. या निधीचा उपयोग समाजासाठी व उत्पादन प्रकल्पांभोवतीच्या परिसरातील लोकांसाठी वापरण्यात येणार आहे.
हेही वाचा- सॅनिटायझरची खरेदी करण्याकरता 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार १ हजार रुपये
कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी वेदांत कंपनीने कर्मचाऱयांना विमान संरक्षण देणार असल्याचेही जाहीर केले आहे. उत्पादन प्रकल्प व कामाच्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा असणारी फिरती वाहने उपलब्ध करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजार ३,१८२ अंशांनी आपटला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी पाण्यात
वेदांत रिसोर्स लि. कंपनीचे कार्यकारी संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, की कॉर्पोरेट हाऊसने सरकारला मदत करायला पाहिजे. निधी उभा करण्याचे पहिले पाऊल आहे. गरज भासली तर आणखी मदत करण्यात येणार आहे.