ETV Bharat / business

हूवाईनंतर चीनच्या आणखी ४ चार तंत्रज्ञान कंपन्यांवर अमेरिकेकडून बंदी - Xi Jinp ing

सुगॉन या चीनच्या सुपरकॉम्प्युटर उत्पादन कंपन्यांसह मायक्रोचिप तयार करणाऱ्या कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. तर याचबरोबर पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या कॉम्प्युटिंग इन्स्टिट्यूटवर वाणिज्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. या बंदीमुळे संबंधित कंपन्यांना अमेरिकेचे तंत्रज्ञान घेता येणार नाही.

प्रतिकात्मक - चीन-अमेरिका व्यापारी युद्ध
author img

By

Published : Jun 22, 2019, 7:42 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध दिवसेंदिवस आणखीनच भडकत आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने चीनच्या पाच तंत्रज्ञानविषयक कंपन्यांवर शुक्रवारी बंदी घातली आहे. या निर्णयाने चीनमधी सुपरकॉम्प्युटर उत्पादन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये आणखी तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

सुगॉन या चीनच्या सुपरकॉम्प्युटर उत्पादन कंपन्यांसह मायक्रोचिप तयार करणाऱ्या कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. तर याचबरोबर पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या कॉम्प्युटिंग इन्स्टिट्यूटवर वाणिज्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. या बंदीमुळे संबंधित कंपन्यांना अमेरिकेचे तंत्रज्ञान घेता येणार नाही. या कंपन्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात अथवा अमेरिकेच्या परराराष्ट्र धोरणाशी विसंगत काम करत असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांत दोन आर्थिक महासत्तामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने हुवाई या चीनच्या कंपनीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेने निर्बंध लागू केल्यानंतर फेसबुक आणि गुगलने हुवाईकडून घेण्यात येणाऱ्या उत्पादनात कपात करणार असल्याचे जाहीर केले. चीन सरकारने अमेरिकन कंपनी डेल, मायक्रोसॉफ्ट आणि दक्षिण कोरियाच्या सॅमसंगच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पुढील आठवड्यात जपानमधील जी २० परिषदेत चर्चा करणार आहेत. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार संबंधामंधील वादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.