ETV Bharat / business

केंद्राकडून कोरोना लशीसह ऑक्सिजन उपकरणांवरील आयात शुल्क माफ - Prime Minister on oxygen supply measures

रुग्णालयासह घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्वरित ऑक्सिजन मिळण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित व्यक्त केली आहे. त्यासाठी सर्व मंत्रालय आणि विभागांनी एका उर्जेने काम करावे, असे पंतप्रधानांनी निर्देश दिले आहेत.

COVID vaccines
कोरोना लस
author img

By

Published : Apr 24, 2021, 7:09 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना ऑक्सिजन पुरवठ्याला चालना मिळण्याकरता केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने लस, ऑक्सिजन आणि इतर संबंधित उपकरणांवरी मुलभूत सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर आजपासून माफ केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज कोरोना लस, ऑक्सिजन आणि इतर संबंधित उपकरणांवरील मुलभूत सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर हा आजपासून तीन महिन्यांसाठी माफ केला आहे. त्यामुळे लशीसह ही आरोग्याची उपकरणे, ऑक्सिजनच्या किमती मुबलक उपलब्ध होऊन किमती कमी होणार असल्याची सरकारला अपेक्षा आहे. रुग्णालयासह घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्वरित ऑक्सिजन मिळण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित व्यक्त केली आहे. त्यासाठी सर्व मंत्रालय आणि विभागांनी एका उर्जेने काम करावे, असे पंतप्रधानांनी निर्देश दिले आहेत.

हेही वाचा-अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचा छापा; सीबीआयने नेमके काय सील केले?

नुकतेच केंद्र सरकारने रेमडेसिवीर आणि त्याच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सक्रिय औषधी घटकांवरील (एपीआय) आयात शुल्कही माफ करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी बैठकीत म्हटले आहे.

हेही वाचा- ऑक्सिजन पुरवठ्यात कोणी अडथळा आणत असेल तर फासावर लटकवा-दिल्ली उच्च न्यायालय

काय होणार स्वस्त?

वैद्यकीय दर्जाचा ऑक्सिजन, फ्लोमीट सह ऑक्सिजन कॉन्स्ट्रेट्र, प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन ऑक्सिजन प्लांट, क्रायोजेनिक ऑक्सिजन एअर सेप्रेशन युनिट, ऑक्सिजन फिलिंग सिस्टिम आदी उपकरणे आयात शुल्क माफ केल्याने स्वस्त होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.