नवी दिल्ली - पोलिसांकडून धमकाविणारी रणनीती वापरली जात असल्याच्या ट्विटरच्या दाव्याचा केंद्र सरकारने फेटाळले आहे. ट्विटरने केलेले दावे हे निराधार, चुकीचे आणि भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले, की सोशल मीडियाचे मोहिम करणारे प्रतिनिधीसह ट्विटर हे भारतामध्ये सुरक्षित राहणार आहे. त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेला कोणताही धोका नाही. ट्विटरचे विधान म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला हुकमशाही म्हणण्यासारखे असल्याची टीका केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केली. ट्विटरकडून जाणीवपूर्वक विरोध आणि कृती करून देशाच्या कायदेशीर व्यवस्थेला कमी प्रभावी करण्याचा प्रयत्न असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नमूद केले.
हेही वाचा-पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीती चिंताजनक - ट्विटर
ट्विटरकडून जारी करण्यात आलेले दुर्दैवी विधान सरकार फेटाळून लावत आहे. ट्विटरचे विधान हे संपूर्णत: तथ्यहीन, चुकीचे आणि स्वत:चा मूर्खपणा लपविण्यासाठी भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केला आहे.
हेही वाचा-१२ वर्षांहून अधिक वयोगटाकरिता कोरोना लस प्रभावी- फायझरची केंद्राला माहिती
काय म्हटले होते ट्विटरने?
भाजपच्या प्रवक्त्यांचे ट्विट मॅनिप्युलेटेड टॅग केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर ट्विटरने प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीती चिंताजनक असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. भारतामधील ट्विटरचे कर्मचारी असल्याचे सांगत ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. सरकारने लागू असलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी कंपनी मोठी मेहनत घेत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नियम हे अडथळा विरहीत, मुक्त जनसंवाद करावेत, अशी अपेक्षा ट्विटरने व्यक्त केली आहे.
हेही वाचा-चलनी नोटा छापण्याची वेळ आली - उदय कोटक यांचा केंद्राला सल्ला
मॅनिप्युलेटेड मीडियात टॅग केल्याने दिल्ली पोलिसांची नोटीस
दिल्ली पोलिसाच्या विशेष सेलने सोमवारी ट्विटर इंडियाला कोव्हिड टूलकीटच्या तपासाबाबत नोटीस पाठविली आहे. कोणत्या माहितीवरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे ट्विट मॅनिप्युलेटेड मीडियात टॅग केले आहे, अशी दिल्ली पोलिसांनी नोटीसमध्ये विचारले आहे. दिल्ली पोलिसांचे पथक दिल्लीमधील लाडो सराई व गुरुग्राम येथील ट्विटर कार्यालयात धडकले होते.
या कारणाने ट्विटर आणि केंद्रात पेटला वाद-
दिल्ली पोलिसाच्या विशेष सेलने सोमवारी ट्विटर इंडियाला कोव्हिड टूलकीटच्या तपासाबाबत नोटीस पाठविली आहे. कोणत्या माहितीवरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे ट्विट मॅनिप्युलेटेड मीडियात टॅग केले आहे, अशी दिल्ली पोलिसांनी नोटीसमध्ये विचारले आहे. दिल्ली पोलिसांचे पथक दिल्लीमधील लाडो सराई व गुरुग्राम येथील ट्विटर कार्यालयात धडकले होते.