लंडन - चीन सरकारच्या कौतुकाचे तुणतुणे वाजवणारे मोठे ऑनलाइन नेटवर्क ट्विटरने बंद केले आहे. ट्विटरने चीनचा प्रचार करणारे सुमारे 23 हजार 750 अकाउंट बंद केले आहेत.
ट्विटरने चीनच्या बाजूने मांडणारे ट्विट रिट्विट करण्यासाठी सुरू ठेवलेली दीड लाख अकाउंट बंद केले आहेत. त्यावर बोलताना चीन सरकारने चीनची बदनामी करणारे खाते ट्विटरने आधी बंद करावीत असे म्हटले.
ट्विटरवर चीनचे एक नेटवर्क अस्तित्व होते. त्यात चिनी भाषेमधून कोरोनाच्या काळात चीन सरकारने केलेल्या कामाचे कौतुक करण्यात येत होते. यामध्ये हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीसाठी केलेल्या प्रदर्शना विरोधात टीका करण्यात येत होती.
ट्विटरवरने नियमभंग केल्यामुळे ती खाते बंद केली आहेत. या धोरणानुसार कृत्रीम प्रभाव व माहिती दाबून टाकणे, अशा कृत्यावर ट्विटरवरून आळा घालण्यात येतो.
विशेष म्हणजे चीनमध्ये ट्विटरसह आणि युट्युब समाज माध्यमे वापरण्याची नागरिकांना परवानगी नाही. त्यावर कठोरपणे बंदी लागू करण्यात आलेली आहे.
ऑस्ट्रेलियन स्टेटस पॉलिसी इन्स्टिट्यूटमधील इंटरनॅशनल सायबर पॉलिसी सेंटरचे संचालक हंसल म्हणाले, की चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने चिनी लोकांना ट्विटर वापरण्याची परवानगी दिली नाही. मात्र चुकीची माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरविण्यासाठी चीन त्याचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.
ट्विटरने रशियाची 1हजार ट्विटर अकाउंटही बंद केले आहेत. त्यामधून राजकीय अजेंडा सुरू होता.