नवी दिल्ली - भारतीय उद्योगांनी त्यांच्या सध्याच्या क्षमतेनुसार अमेरिकेत विस्तार करावा, अशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजकांना विचारणा केली आहे. दुसऱ्या बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यासाठी भारतीय कंपन्यांनी अमेरिकेचा गेटवे म्हणून वापर करावा, असे त्यांनी भारतीय उद्योगांच्या बैठकीत असे म्हटले आहे.
अमेरिकेत उपकंपनी असलेल्या उद्योगांनी त्या कंपन्यांत अधिक गुंतवणूक करावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोत्साहन दिले आहे. अमेरिकेत अधिक रोजगार आणि आर्थिक चालना देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी भूमिका घेतली आहे. भारतीय उत्पादन कंपन्यांनी अमेरिकेत विस्तार करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे प्रोत्साहित करत असल्याचे इंडियन इंडस्ट्री चेंबरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिंद्राने अमेरिकेत १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे गतवर्षी जाहीर केले आहे. भारत फोर्जने नॉर्थ कॅरोलिनामध्ये ५६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे गेल्या वर्षी जाहीर केले. बांधकाम उद्योगातील एल अँड टीचे अमेरिकेत दोन डिलिव्हरी सेंटर आहेत. टाटा ग्रुपच्या अमेरिकेत १३ कंपन्या आहेत. तर ३५ हजार कर्मचारी आहेत.
हेही वाचा-साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे २,४०० कोटी रुपये थकित
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, एल अँड टीचे चेअरमन ए. एम. नाईक, बायकॉनचे सीएमडी किरण मुझुमदार शॉ हे मुख्य कार्यकारी अधिकारी दिल्लीमधील ट्रम्प यांच्या गोलमेज बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, भारती एअरटेलचे चेअरमन सुनिल मित्तल, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन हे बैठकीला उपस्थित असणार आहेत.
हेही वाचा-उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच एसीच्या दरवाढीचे चटके
भारताबरोबर सर्वात मोठा करार होईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संकेत दिले आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धीदर हा २०१९ मध्ये २.३ टक्के राहिला आहे. हा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी वृद्धीदर आहे.