वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपुर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरसह इतर समाज माध्यमांवर अंकुश आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेश काढल्याने सरकारी संस्थांना फेसबुक आणि ट्विटरसारख्या समाज माध्यम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकार मिळणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले ट्विट हे भ्रामक असल्याचे ट्विटर कंपनीने ऑनलाईन लेबलिंग दर्शविले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी मोठी कारवाई करणार असल्याचे ट्विटरवरूनच जाहीर केले होते.
हेही वाचा-टाळेबंदीने उपासमार; व्यवसाय सुरू करण्याची फूल विक्रेत्यांची सरकारकडे मागणी
अमेरिकेच्या इतिहासात बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आलेल्या सर्वात मोठ्या धोक्यापासून वाचविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांच्या ओवल कार्यालयाने म्हटले आहे. यावर कायदेशीर समस्याही असल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले आहे. समाज माध्यम कंपन्या आदेशाविरोधात न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे. मात्र, आम्ही खूप चांगले काम करणार आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-होम क्रेडिट इंडियाकडून १८०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीला 'टाळेबंदी'
ट्विटर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये वाद सुरू-
पंरपरावादी आवाज दाबण्याचा प्रयत्न ट्विटरकडून केला जात असल्याचे ट्विट ट्रम्प यांनी केले होते. हे असे होण्यापूर्वी कडक नियम करू अथवा या कंपनीला बंद करू, असा त्यांनी इशारा दिला होता.
हेही वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकरणात मार्क झुकेरबर्गची ट्विटरवर टीका