नवी दिल्ली - वाहतूक करणाऱ्यांना सरकारने तातडीने दिलासा दिला नाही, तर त्याचा जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीवर परिणाम होईल, असा एआयएमटीसीने इशारा दिला आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) प्रत्यक्ष जमिनी स्थितीवर दिवसेंदिवस स्थिती खराब होत असल्याचे म्हटले आहे. त्याचा परिणाम म्हणून आणखी मोठे संकट निर्माण होईल, असेही संघटनेने म्हटले आहे.
टाळेबंदीत सुमारे ३० टक्के वाहन रस्त्यावर आहेत. यामधील बहुतांश ट्रक हे जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करत आहेत. विविध अडचणींमुळे ट्रक, कंटेनर आणि इतर वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वाहतूक, बिगर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक तसेच आयात-निर्यातीवर परिणाम होईल, असे एआयटीएमसीने म्हटले आहे.
हेही वाचा-वुईवर्क इंडियांच्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
देशातील ९५ लाख वाहतूकदारांकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. तसेच मासिक कर्जाचा हप्ता आणि विमा हप्त्यासाठी पैसे नाहीत, असे त्यांनी सांगितले. एआयएमटीसी ही वाहतूकदारांची संघटना आहे. या संघटनेचे देशात ९५ लाख ट्रकचे मालक सदस्य आहेत.
हेही वाचा-GRAPHICS : जाणून घ्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेले आर्थिक पॅकेज