ETV Bharat / business

बँकेच्या आरटीजीएस आणि एनईएफटी प्रणालीतून पैसे पाठविणे आजपासून स्वस्त - RBI

आरबीआयने आरटीजीएस आणि एनईएफटी सेवेवर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा १ जुलैपासून ग्राहकापर्यंत फायदा पोहोचविण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 1, 2019, 3:21 PM IST

मुंबई - तुम्ही बँकेच्या ऑनलाईन सेवा घेत असाल तर तुमच्यासाठी ही उपयुक्त बातमी आहे. बँकेकडून ग्राहकांना आरटीजीएस आणि एनईएफटी प्रणालीमधून पैसे पाठविण्याची सुविधा देण्यात येते. ही सेवा आजपासून स्वस्त झाली आहे.

आरबीआयने आरटीजीएस आणि एनईएफटी सेवेवर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा १ जुलैपासून ग्राहकापर्यंत फायदा पोहोचविण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

काय आहे आरटीजीएस-
आरटीजीएस (रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट) या प्रणालीतून मोठी रक्कम काही क्षणातच पाठविली जाते. तर नॅशनल ईलेक्ट्रॉनिक फंडमधून (एनईएफटी) केवळ २ लाख रुपयापर्यंत रक्कम पाठविता येते.

डिजीटल व्यवस्थेमधून पैसे पाठविण्याला चालना मिळावी म्हणून आरबीआयने आरटीजीएस व एनईएफटीवरील शुल्क माफ केले आहे. यामुळे बँकांना ग्राहकांकडून कमी शुल्क आकारणे शक्य होणार असल्याचे इंडिय बँक असोसिएशनचे चेअरमन सुनील मेहता यांनी म्हटले आहे.

काय आहेत आरटीजीएस व एनईएफटीचे शुल्क-
देशातील सर्वात मोठी बँक एनईएफटीसाठी १ ते ५ रुपये शुल्क आकारले जाते. तर आरटीजीएससाठी ५ ते ५० रुपये शुल्क आकारले जाते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने आबीएचे अध्यक्ष व्ही.जी.कन्नान यांच्या अध्यतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती बँकाकडून एटीएम सेवेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा आढावा घेणार आहे. देशात एटीएमचा वापर लक्षणीय वाढत चालला आहे. त्यामुळे एटीएमचे शुल्क बदलावे, अशी सातत्याने मागणी होत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.