बंगळुरू/लखनौ - दिवाळी म्हटले की अनेकजण फटाके, रॉकेट आणि सुतळी बॉम्ब उडविण्याचा आनंद लुटतात. हेच फटाके तुम्हाला खाता आले तर...काही बेकरीचे व मिठाई दुकाने आणि खासगी उद्योजकांनी मिठाई ही विविध फटाक्यांच्या डिझाईनमध्ये विक्रीसाठी बाजारात आणली आहेत. ही फटाक्यांप्रमाणे दिसणारी मिठाई ग्राहकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
विशेष म्हणजे फटाक्यांप्रमाणे दिसणारी मिठाई ही कमी कॅलरीची आहेत. यामध्ये चोको चक्र, क्रिस्पी फटाका, बटरस्कॉच फ्लॉवर पॉट, कॉफी रॉकेट, इलायची अॅटम बॉम्ब, क्रिस्पी शॉट्स व फेस्टिव्ह मोतीफ यांचा समावेश आहे.
बंगळुरूच्या वूब्री संस्थेने ही चोको फटाके तयार केली आहेत. यामधून दिवाळी ही पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या फटाक्यांऐवजी पर्यावरणस्नेही करण्याचा उद्देश्य असल्याचे श्रीधर मुर्ती यांनी सांगितले. हे चॉकटेलपासून तयार केलेले फटाके आबालवृद्धांच्या पसंतीस पडले आहेत. या मिठाईची ग्राहकांकडून खरेदी होत आहे. तसेच ही मिठाई भेट म्हणूनही देण्यासाठीही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे.
हेही वाचा-दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी; धनत्रयोदशीला मात्र सराफा बाजाराकडे पाठ
मिठाई विक्रेते कृष्णा अहिरवार म्हणाले, आम्ही यंदा अनोख्या पद्धतीने डिझाईन केल्या आहेत. सुतळी बॉम्ब हे चॉकलेटने तयार केली आहेत. त्यामध्ये टॉफी भरली आहे. अनेक ग्राहकांना आम्ही खरोखर सुतळी बॉम्ब विकत असल्याचे वाटले. सुतळी बॉम्बची किंमत ८५ रुपये आहे. हे फटाके काचेच्या विविध बाटली आणि बरण्यामध्ये विक्रीला उपलब्ध करण्यात आली आहेत. सर्व चॉकलेट ही साखरमुक्त आहेत. तर काही चॉकलेटमध्ये साखरेचे कमी प्रमाण आहे. मधुमेह असलेल्या ग्राहकांकडून तशी विनंती करण्यात आल्याचे मन्नु अग्रवाल यांनी सांगितले. त्यांनी बेकरीमध्ये ही उत्पादने उपलब्ध केली आहेत.