नवी दिल्ली – टेमा या दूरसंचार उत्पादकांच्या संघटनेकडून सरकारच्या डिजीटल अर्थव्यवस्थेच्या धोरणाला मदत होईल, अशी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून कधी नव्हे तेवढ्या वेगाने बदल घडणार आहे. दूरसंचार सेवेच्या व्यवसायामध्ये नवसंशोधन वेगाने करणे हे केंद्रस्थानी झाले आहे. त्याचा परिणाम दूरसंचार साधने आणि उत्पादनावर होत आहे.
सध्या, मुख्य ठरू शकणारे नवसंशोधन हे स्टार्टअपकडून येणार आहे, असा टेमाचा विश्वास आहे. त्यामुळे टेमाकडून स्टार्टअपबाबत अधिक महत्त्व व लवचिकतेचा दृष्टीकोन स्वीकारण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत टेमाने पुढील महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टेमाने स्टार्टअपच्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या चेअरमनपदी अरुण सेठ यांनी निवड केली आहे.
उत्पादने हे स्टार्टअप आणि त्यांच्या तंत्रज्ञानासाठी जोडण्याचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्टार्टअपला महत्त्व देण्यात येत आहे. त्यांच्यासाठी विविध योजना आणि सवलतींच्या घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे उत्पादने हे स्टार्टअप आणि त्यांच्या तंत्रज्ञानासाठी जोडण्याचा निर्णय टेमाने घेतला आहे. त्यामधून तंत्रज्ञानाचे पर्याय, बाजारातील संधी, सामाजिक प्रकल्प, टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांसह केंद्र सरकारला मदत होईल, असा टेमा संस्थेला विश्वास आहे.
स्टार्टअपसाठी राष्ट्रीय धोरण परिषद
टेमा संस्थेचे चेअरमन रवी शर्मा म्हणाले, टेमाने स्टार्टअपसाठी राष्ट्रीय धोरण परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामधून दूरसंचार उत्पादने आणि साधनांची निर्मितीला प्रोत्साहन व मदत करण्यात येणार आहे. भविष्यातील नेटवर्क हे खास सॉफ्टवेअर आणि बाजारपेठेला उपयुक्त ठरणारे हार्डवेअर यांचे असणार आहे. नव्या उपक्रमामुळे दूरसंचार उत्पादनातील नवसंशोधना गती मिळणार आहे. त्यामधून आत्मनिर्भर भारत अभियाने उद्दिष्ट साध्य होणार आहे. तसेच स्वदेशी उत्पादित 5 जी, 6 जी व आयओटी नेटवर्कची उत्पादने देशात वापरता येणार आहेत.
भारत स्टार्टअपचे नेतृत्व करू शकतो
अरुण सेठ म्हणाले, की भविष्यातील नेटवर्क मग ते 5 जी, 6 जी अथवा आयओटी किंवा त्याहून कोणतेही तंत्रज्ञान असले तरी मुलभूत तत्व हे सॉफ्टवेअरचेच असणार आहे. भारताने सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रभुत्व सिद्ध केले आहे. आपल्या स्टार्टअप समुदायाकडून योग्य मार्गदर्शन आणि मदत, संशोधन प्रयोगशाळा, आयआयटी आणि विद्यापीठांचे सहकार्य यामधून भारत स्टार्टअपचे नेतृत्व करू शकतो. त्यामधून भविष्यातील नेटवर्कच्या सामर्थ्य वाढू शकते. जागतिक कंपन्या निर्माण होवू शकते.
कोण आहेत सेठ?
सेठ यांनी नॅसकॉम बीपीओ परिषद, नॅसकॉम प्रॉडक्ट कॉनक्लेव्ह अशा विविध संस्थांसाठी काम केले आहे. ते स्टार्टअपसाठी मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी मिळाली आहे. तर आयआयएम कोलकातामधून एमबीए पूर्ण केले आहे. ते गिव्ह इंडिया आणि हेल्पएज इंडियासारख्या सेवाभावी संस्थांच्या संचालक मंडळावरही आहेत.
प्राध्यापक एन. के. गोयल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिलेले स्टार्टअप इंडिया आणि नवसंशोधन हे देशाच्या आर्थिक विकासाठी मुख्य साधन आहे. टेमा ही स्टार्टअपच्या विकासावर काम करणार आहेत. त्यामध्ये तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक अशी कामे करण्यात येणार आहेत.