ETV Bharat / business

टाटा स्टीलकडून आठवडाभरात ऑक्सिजनची दुप्पट निर्मिती; रोज 600 टनचा पुरवठा

author img

By

Published : Apr 26, 2021, 4:06 PM IST

स्टील मंत्रालयाने ऑक्सिजनचा प्लांट असलेल्या उद्योगांना ऑक्सिजनचे अधिक उत्पादन घेण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार टाटा स्टील कंपनीने द्रवरुपातील वैद्यकीय ऑक्सिजनचे (एलएमओ) उत्पादन वाढविले आहे.

oxygen supply
ऑक्सिजन निर्मिती

नवी दिल्ली - कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असताना टाटा स्टील कंपनीने दिलासा दिला आहे. कंपनीने ऑक्सिजने उत्पादन वाढवून 600 टन केले आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांना ऑक्सिजन नसल्याने इतर रुग्णालयात हलवावे लागले आहे. त्यामुळे स्टील मंत्रालयाने ऑक्सिजनचा प्लांट असलेल्या उद्योगांना ऑक्सिजनचे अधिक उत्पादन घेण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार टाटा स्टील कंपनीने द्रवरुपातील वैद्यकीय ऑक्सिजनचे (एलएमओ) उत्पादन वाढविले आहे.

हेही वाचा-कळंबोली रेल्वे स्थानकात ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल

टाटा स्टील कंपनीने ट्विटमध्ये म्हणाले, की लॉजिस्टिक्सच्या मदतीने टाटा स्टीलकडून दररोज ऑक्सिजन पुरवठा वाढवून 500 ते 600 टन केला आहे. आम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारबरोबर जवळून काम करत आहे. गेल्या आठवड्यात टाटा स्टील कंपनीकडून रोज 300 टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता.

हेही वाचा-जळगावात अत्यवस्थ रुग्णसंख्येचा आलेख चढता; ऑक्सिजनची मागणीही वाढली

दरम्यान, टाटा ग्रुपने देशातील ऑक्सिजनच्या पूर्ततेसाठी जर्मनीमध्ये ऑक्सिजनचे 24 टँकर खरेदी केले आहेत. हे टँकर ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी भारतामध्ये आणले जाणार आहेत. टाटा ग्रुपकडून विलगीकरण केंद्र हॉस्पिलटमध्ये ऑक्सिजन पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनेही भारतीय हवाई दलाला जर्मनीवरून ऑक्सिजन कंटेनर आणि इतर साधने आणण्याचे आदेश दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.