नवी दिल्ली : टाटा मोटर्सने Tata Motors मंगळवारी सांगितले की ते 1 एप्रिलपासून वैयक्तिक मॉडेल आणि प्रकारानुसार त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2-2.5 टक्क्यांनी वाढवतील.पोलाद, अॅल्युमिनियम आणि इतर मौल्यवान धातू तसेच कच्च्या तेलाच्या वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे व्यावसायिक वाहनांच्या या किमतीत वाढ झाली आहे, असे टाटा मोटर्सने निवेदनात म्हटले आहे.
"कंपनीने वाढीव खर्चाचा महत्त्वपूर्ण भाग घेण्यासाठी काही हालताली केल्या जात आहेत. उत्पादनाच्या विविध स्तर तसेच एकूण इनपुट खर्चात प्रचंड वाढ झाल्याने काही गोष्टींच्या किमतीत वाढ करणे अत्यावश्यक होते," असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मागील आठवड्यात, मर्सिडीज-बेंझ इंडियाने ( Mercedes-Benz India ) इनपुट खर्चातील वाढ भरून काढण्यासाठी 1 एप्रिलपासून संपूर्ण मॉडेल श्रेणीच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवण्यात येतील.
हेही वाचा - Top Thai Band Trade Fair 2022 : पुण्यातील उद्योगांच्या प्रदर्शनात थायलंडमधील ३४ उद्योजक होणार सहभागी!