ETV Bharat / business

टाटा मोटर्स पुढील आठवड्यापासून प्रवासी वाहनांच्या वाढविणार किमती - Tata Motors hike passenger vehicle prices

वर्षभरात स्टील आणि मौल्यवान धातुंच्या खूप किमती वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर 8 ते 8.5 टक्के परिणाम होत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढत असताना महागाईचा थोडा भार हा ग्राहकांवर पडणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

टाटा मोटर्स
टाटा मोटर्स
author img

By

Published : Jul 28, 2021, 2:57 PM IST

नवी दिल्ली - टाटा मोटर्स पुढील आठवड्यापासून सर्व प्रवासी वाहनांच्या किमती वाढविणार आहे. स्टील आणि मौल्यवान धातुंच्या किमती वाढविल्याने टाटा मोटर्सने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये कंपनी कार्यालय असलेल्या टाटा मोटर्सकडून टायगो, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी या प्रवासी वाहनांची देशात विक्री करण्यात येते. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विक्री विभागाचे (पीव्हीबी) अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले, की वर्षभरात स्टील आणि मौल्यवान धातुंच्या खूप किमती वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर 8 ते 8.5 टक्के परिणाम होत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढत असताना महागाईचा थोडा भार हा ग्राहकांवर पडणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-BS Yediyurappa: बी. एस. येडियुरप्पा यांच्यासाठी भाजपाने तोडला होता 'हा' नियम

ग्राहकांवर केवळ 2.5 टक्के महागाईचा भार पडणार आहे. तर एक्स-शोरुम वाहनांच्या किमतीत 3 टक्क्यांनी वाढणार आहे. वाहनांच्या किमती कमी करण्यासाठी विविध कंपनीने उपाययोजना केल्या आहेत. रायडोयिम आणि पॅलाडियमच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

हेही वाचा-Monsoon Session Updates : विरोधकांचा लोकसभेत गदारोळ; कामकाज तहकूब

मारुती सुझुकी इंडियाने हॅचबॅक स्विफ्ट आणि सीएनजीच्या विविध मॉडेलच्या किमती 15 हजार रुपयापर्यंत वाढविल्या आहेत. होंडा कंपनीने ऑगस्टपासून सर्व मॉडेलच्या किमती वाढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा-#NEET परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.