नवी दिल्ली - बँक कर्मचाऱ्यांचा ८ जानेवारीला एक दिवसाचा संप आहे. या संपाबाबतची नोटीस विविध बँक कर्मचारी संघटनांनी सिंडिकेट बँकेला दिली आहे. कामकाज व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पावले उचलत असल्याचे सिंडिकेट बँकेने म्हटले आहे.
ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्पलॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेसने सिंडिकेट बँकेला संपाची नोटीस दिली आहे. संप होणार असल्याचे बँकेच्या कामकाजावर परिणाम होवू शकतो, असे सिंडिकेट बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
हेही वाचा-चीनचा दक्षिण आफ्रिकेतील बाजारपेठेवर डोळा; 'अशी' आहे भारताशी कट्टर स्पर्धा
देशातील १० कामगार संघटनांनी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी ८ जानेवारीला संप पुकारला आहे.
हेही वाचा-आरोग्याला अपायकारक अन्नपदार्थांवर अधिक कर हवा- सौम्या स्वामीनाथन