नवी दिल्ली - स्पॉटिफाय या गाण्यांच्या स्ट्रीमिंग अॅपने डेस्कटॉपच्या वापरासाठी नवीन बदल केला आहे. स्पॉटिफाय हे डेस्कटॉपमध्ये विन्डोज आणि मॅकच्या व्हर्जनसाठी अद्ययावत झाले आहे.
स्पॉटिफायच्या संरचनेतील बदलानंतर वापरकर्त्याला डेस्कटॉपवर नवीन फिचरही मिळणार आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे डेस्कटॉप वापरताना स्पॉटिफायच्या वापरकर्त्यांना मोबाईलप्रमाणेच फिचर वापरता येणार आहेत. नवीन बदलासाठी काही महिने संशोधन आणि चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच वापरकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहे. त्यानंतर ही स्वच्छ डिझाईन सादर करताना आनंद होत असल्याचे स्पॉटिफायने म्हटले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना डेस्कटॉपवर चांगले संगीत ऐकण्याचा आनंद घेता येणार आहे.
हेही वाचा-स्पॉटिफाय १२ भारतीय भाषांमध्ये होणार उपलब्ध
प्रिमियम स्पॉटिफायच्या वापरकर्त्यांना डेस्कटॉप अॅपवरूनही गाणे डाऊनलोड करता येणार आहे. अॅपमध्ये सर्च करताना डाव्याबाजून सर्च टूलचा पर्याय देण्यात आला आहे. यापूर्वी होम स्क्रिनवर टॉपला सर्च टूल देण्यात आले होते. तसेच प्लेलिस्टमध्ये सर्च बार देण्यात आलेला आहे. हे अॅप जगभरात सुरू करण्यात आले आहे. मात्र, प्रत्येकापर्यंत अॅप पोहोचण्यासाठी काही आठवडे लागणार आहेत.
हेही वाचा-कोव्हॅक्सच्या चाचणीची भारतात सुरुवात; सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता
स्पॉटिफाय 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध!
स्ट्रीमिंगमधील आघाडीची कंपनी स्पॉटीफायने १३ भारतीय भाषांमध्ये ऑडिओ उपलब्ध करून देण्याचे 12 मार्चला जाहीर केले आहे. स्पॉटिफाय हे हिंदी, गुजराती, भोजपुरी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलुगु, उर्दु आणि बंगाली भाषेत उपलब्ध होणार आहे. स्पॉटिफायने म्हटले की, भारतीय वापरकर्त्यांसाठी ओडिओ कंटेन्ट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. भारतीयांना त्यांच्या बोलणाऱ्या भाषेत अनुभव उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे. ओडिओ इकोसिस्टिम ही खऱ्या अर्थाने सीमाविरहित असणार आहे.