ETV Bharat / business

सार्वभौम सुवर्णरोखे खरेदी करण्याची आहे संधी; जाणून घ्या, सविस्तर माहिती - gold bond

सुवर्णरोखे हे आरबीआयकडून जारी झालेले सरकारी रोखे आहेत. हे रोखे विविध ग्राममध्ये उपलब्ध आहेत. केंद्र सरकारकडून हमी असल्याने हे रोखे गुंतवणुकीची रक्कम आणि व्याज मिळविण्यासाठी अत्यंत सुरक्षित आहेत.

Sovereign Gold Bonds
सार्वभौम सुवर्णरोखे खरेदी
author img

By

Published : May 24, 2021, 5:45 PM IST

बिझनेस डेस्क-ईटीव्ही भारत : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचे नियोजन करणार असाल तर, ही तुमच्यासाठी महत्त्वाची बाती आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोखे (सोव्हर्जियन गोल्ड बाँड) खरेदी करण्याचा पर्याय खुला केला आहे. यामध्ये प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ४,८४२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे सुवर्णरोखे आजपासून पाच दिवसापर्यंत खरेदी करता येणार आहे.

जे लोक सोन्याची खरेदी केवळ गुंतवणुकीसाठी करतात, त्यांच्यासाठी सुवर्णरोखे हा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण, भौतिक सोन्यापेक्षा सुवर्णरोख्यांचे खूप फायदे आहेत. हे सुवर्णरोखे २८ मे २०२१ पर्यंत खुले असणार आहेत. त्याबाबत ईटीव्ही भारत तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे.

हेही वाचा-'स्पूटनिक व्ही'चे पॅनासिया बायोटेककडून हिमाचल प्रदेशमध्ये उत्पादन सुरू

काय आहेत सुवर्णरोखे?

सुवर्णरोखे हे आरबीआयकडून जारी झालेले सरकारी रोखे आहेत. हे रोखे विविध ग्राममध्ये उपलब्ध आहेत. केंद्र सरकारकडून हमी असल्याने हे रोखे गुंतवणुकीची रक्कम आणि व्याज मिळविण्यासाठी अत्यंत सुरक्षित आहेत.

हेही वाचा-तीन दिवसात राज्यांना मिळणार ४८ लाख लशींचे डोस - केंद्र सरकार

सुवर्णरोख्यांचे काय आहेत फायदे?

  • सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेवर व्याज देण्यात येते. तसेच रोखे कर्जासाठी तारण ठेवता येतात.
  • गुंतवणुकदारांना वार्षिक २.५ टक्के व्याजदर मिळतो.
  • सुवर्ण रोखे खरेदीवर भौतिक सोन्याच्या खरेदीप्रमाणे जीएसटी लागू होत नाही.
  • हे सुवर्णरोखे कागदपत्रांच्या स्वरुपात असल्याने चोरीची भीती राहत नाही.
  • सुवर्ण रोख्यांना सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे घडणावळ अथवा शुद्धतेप्रमाणे काही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही.
  • ऑनलाईन अथवा डिजीटल पद्धतीने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत देण्यात येते.

हेही वाचा-सिप्ला 'या' औषधाची करणार विक्री; मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा

सुवर्णरोख्याच्या गुंतवणुकीकरिता किती वर्षांची मुदत असते?

सुवर्णरोख्यांचा कालावधी ८ वर्षांसाठी आहे. तर ५ वर्षानंतर योजनेमधून बाहेर पडण्याचा गुंतवणूकदारांना पर्याय आहे. मात्र, या गुंतवणूकदारांना सुवर्णरोख्यांवरील व्याज मिळणार नाही.

सुवर्णरोख्यामध्ये किती गुंतवणूक करता येते?

सरकारच्या माहितीनुसार ग्राहकांना वैयक्तिकपणे सुवर्ण रोखे खरेदीतून जास्तीत जास्त ४ किलोपर्यंत सोन्यात गुंतवणूक करता येते. हिंदू अविभक्त ग्रुपला ४ किलो, ट्रस्टला २० किलो सोन्यात सुवर्ण रोख्यामधून गुंतवणूक करता येते.

हे सुवर्ण रोखे कोठून खरेदी करता येते?

बँक, स्टॉक होल्डिंग कॉरपरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचसीआईएल), डाकघर, मान्यताप्रात शेअर बाजार

सुवर्णरोखे खरेदीवरून परतावा कसा मिळतो?

सुवर्णरोखे खरेदीमधून मिळणाऱ्या परताव्यावर प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार कर लागू होतो. मात्र, भांडवली लाभ कराला (कॅपिटल गेन टॅक्स) रोख्यांची मुदत संपत असताना सवलत देण्यात आलेली आहे.

यामुळे सरकारने सुरू केले होते सुवर्ण रोखे-

भारतीयांचा सोने खरेदीकडे असलेला कल लक्षात घेवून मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला २०१५ मध्ये सुरुवात केली होती. योजनेसाठी फक्त भारतीय नागरिक, धर्मादाय संस्था, कंपन्या, ट्रस्ट आदी अर्ज करू शकतात. एक ग्रॅम सोन्यासाठी एक रोख्यात गुंतवणूक करण्यात येते. भौतिक सोन्याची कमी मागणी होण्यासाठी सरकारकडून सुवर्ण रोखे बाजारात आणण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.