नवी दिल्ली - कोरोनाचे संकट असतनाना इंडियाबुल्समधील २ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संक्रात आली आहे. कोणत्याही नोटिशीशिवाय कामावरून काढण्यात आल्याने अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
इंडियाबुल्सरिझाईन हॅशटॅग या नावाने इंग्रजीत ट्विटर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्याची महामारी असतानाही इंडियाबुल्स ही २ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कशी काढू शकते, असा एकाने प्रश्न उपस्थित केला आहे. सुरुवातीला त्यांनी वेतन कपात केले. त्यांनतर राजीमाना देण्यासाठी दबाव निर्माण केला. अशा कठीण काळात कोणाला नवीन नोकरी मिळणार, अशी हतबलता एकाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा-सुरक्षित नसलेल्या झूम अॅपवर बंदी घाला - सर्वोच्च न्यायालयात याचिका
इंडियाबुल्सने पीएम केअर्सला २१ कोटी रुपयांची मदत केली आहे. मात्र २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोणतेही दिलासादायक पॅकेज न देता कामावरून काढले आहे. त्यांना पीएम केअर्सला देण्यासाठी पैसे आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, असे एकाने ट्विट केले आहे. कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप कॉल करून कामावरून कमी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कॉल रेकॉर्डही करता आले नाहीत. याबाबत इंडियाबुल्सकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
हेही वाचा-'रेल्वेची तिकीट खिडकी दोन ते तीन दिवसांत सुरू होणार'
दरम्यान, कोरोना आणि टाळेबंदीमुळे देशातील अनेक कंपन्यांनी नोकरी कपात सुरू केली आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे.