नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटातही केरळमधील महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांनी धाडसाने तीन सोने तस्करांना अटक केली. या कारवाईत जखमी झालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. दोन्ही अधिकाऱ्यांवर वैद्यकीय उपचार करण्याचे आदेश त्यांनी सचिवांना दिले आहेत.
केरळमधील काझिकोड येथील कारिपूर विमानतळावर सोने तस्करीचा प्रयत्न हा दक्ष असलेल्या महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. यावेळी सोने तस्करांनी कारमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारचा दुचाकीने पाठलाग केला. तेव्हा आरोपींनी कारने अधिकाऱ्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात जखमी झालेले दोन्ही अधिकारी रुग्णालयात दाखल आहेत. एक अधिकारी किरकोळ दुखापतीने जखमी झाला आहे. तर दुसरा अधिकारी हाड मोडल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. या अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. नजीब आणि अल्बर्ट ही जखमी झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
हेही वाचा-उद्योगानुकूलतेच्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचा पुन्हा पहिला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या तब्यतेची विचारपूस केली. त्यांना रुग्णालयात सर्व सुविधा पुरविण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी सीबीआयसीला दिले आहेत.
-
Appreciate the dedication with which the team is working in these challenging times. Have directed Secretary, DoR to ensure complete medical care is extended. Kudos for the commitment shown. https://t.co/VvPRkLiwHe
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) September 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Appreciate the dedication with which the team is working in these challenging times. Have directed Secretary, DoR to ensure complete medical care is extended. Kudos for the commitment shown. https://t.co/VvPRkLiwHe
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) September 6, 2020Appreciate the dedication with which the team is working in these challenging times. Have directed Secretary, DoR to ensure complete medical care is extended. Kudos for the commitment shown. https://t.co/VvPRkLiwHe
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) September 6, 2020
हेही वाचा-अमुल करणार मिठाई अन् खाद्य तेलाची निर्मिती
सीतारामन यांनी ट्विटमध्ये म्हटले, की सध्याच्या कठीण परिस्थितीत ज्या पद्धतीने टीम योगदान देत आहे, ते कौतुकास्पद आहे. त्यांनी दाखविलेली जबाबदारी ही कौतुकास्पद आहे. तीनही सोने तस्करांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपींकडील चार किलो सोने कारमधून जप्त करण्यात आले आहे.