ETV Bharat / business

पब्जीसारख्या अनेक चिनी अॅपवरील टळली बंदी; 'हे' असू शकते कारण - china apss Security Threat

भारताने बंदी लागू केल्यानंतर गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून टिकटॉकला हटविण्यात आले आहे. बंदी लागू केलेल्या अॅपचा डाटा इंटरनेटवरून काढण्यासाठी इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या आणि दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांशी सरकारी अधिकारी चर्चा करत आहेत.

पब्जी
पब्जी
author img

By

Published : Jun 30, 2020, 4:37 PM IST

हैदराबाद- केंद्र सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी लागू केली असली तरी अनेक चिनी अॅप बंदीपासून सुटले आहेत. यामध्ये मुलांमध्ये गेमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पब्जीसह अनेक अॅपचा समावेश आहे.

काही चिनी अॅप हे बंदीमधून सुटले आहेत. हे अॅप इतर अॅपप्रमाणे सुरक्षेला धोका नसल्याने त्यांच्यांवर बंदी लागू करण्यात आली नसावी, अशी शक्यता आहे. कदाचित अॅपचे सरकराकडून अजून अवलोकन करण्यात येत असावे. त्यांच्यावरही भविष्यात बंदी लागू करण्यात येवू शकते.

हे अॅपबंदीमधून सुटले आहेत.

  1. पब्जी मोबाईल
  2. एमव्ही मास्टर
  3. अली एक्सप्रेस
  4. टर्बो व्हीपीएन
  5. अप लॉक बाय डू मोबाईल
  6. रॉझ बज वूई मिडिया
  7. 360 सिक्युरिटी
  8. नोनो लाईव्ह
  9. गेम ऑफ सुलतानज
  10. माफिया सिटी

या कारणाने पब्जीची बंदीमधून झाली असावी सुटका

गुप्तचर विभागाने पब्जीपासून भविष्यात काय धोका होवू शकतो, याची माहिती घेतली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोका असलेल्या अॅपमध्ये पब्जीचा समावेश करण्यात आला नाही.

पब्जी हे संपूर्णपणे चिनी अॅप नाही. या अॅपचे व्यवस्थापन हे ब्ल्यूहोल या दक्षिण कोरियाच्या संस्थेकडून चालविले होते. चीनची बलाढ्य कंपनी टेनसेंट कंपनीने ब्ल्यूहोलबरोबर भागीदारी केल्यानंतर पब्जीची लोकप्रियता वाढली. टेनसेंट कंपनीने सुरुवातीला पब्जीचे चीनमधील वितरण आणि काम पाहण्यास सुरुवात केली होती. तर टेनसेंट होल्डिंगकडून भारतामध्ये पब्जीचे वितरण करण्यात येत आहे. या गेमची चिनशी लिंक असल्याचा दावा फेटाळता येवू शकणार नाही. मात्र, मालकी हे संमिश्र स्वरुपाची आहे. त्यामुळेच अॅपवरील बंदी टळण्याची शक्यता आहे.

बंदी लागू झालेल्या अॅपचे काय होणार

भारताने बंदी लागू केल्यानंतर गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून टिकटॉकला हटविण्यात आले आहे. बंदी लागू केलेल्या अॅपचा डाटा इंटरनेटवरून काढण्यासाठी इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या आणि दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांशी सरकारी अधिकारी चर्चा करत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंद झालेले अॅप पूर्णपणे दिसणे बंद होणार आहे.

शिओमीचा स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे काय?

सरकारने बंदी लागू केलेले अॅप हे काही शिओमीच्या स्मार्टफोनमधून सुरू आहेत. यामध्ये एमआय कम्युनिटी आणि एमआय कम्युनिटी व्हिडिओ कॉल यांचा समावेश आहे. हे अॅप सुरुच राहणार असल्याने वापरकर्त्यांना चिंता करण्याचे कारण नाही.

चिनी अॅपचे बाजारात वर्चस्व

गेल्या काही वर्षात चिनी अपॅचे अॅपच्या बाजारात प्रमाण वाढले आहे. 2017 मध्ये जगभरातील पहिल्या 100 अॅपमध्ये 18 अॅपचा समावेश होता. तर 2018 मध्ये ही संख्या वाढून 44 एवढी झाली आहे.

दरम्यान, देशाच्या सार्वभौम, एकता आणि सुरक्षिततेला चिनी अॅपपासून धोका असल्याने त्यावर बंदी लागू केल्याचे केंद्र सरकारने सोमवारी आदेशात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.