ETV Bharat / business

पुण्याच्या 'या' कंपनीकडून कोरोनाची लस; मानवावर घेणार चाचणी - आदार पुनावाला

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लवकरात लवकर लस तयार करणे हा उद्देश आहे. या लसीची उंदीर आणि वानरावर चाचणी घेण्यात आली.

कोरोना लस
कोरोना लस
author img

By

Published : Apr 23, 2020, 9:39 AM IST

Updated : Apr 23, 2020, 10:10 AM IST

नवी दिल्ली - संपूर्ण जगावर संकट आणणाऱ्या कोरोनाची लस तयार करण्यासाठी विविध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या कंपनीपैकी पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान मानवावर चाचणी घेणार असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाची लस ही अमेरिकेची जैवतंत्रज्ञान कंपनी कोडोजेनिक्सच्या सहकार्याने केल्याची माहिती सिरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पुढे ते म्हणाले, की कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लवकरात लवकर लस तयार करणे हा उद्देश आहे. या लसीची उंदीर आणि वानरावर चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये लस ही परिणामकारक दिसून आली आहे.

हेही वाचा-व्हॉट्सअ‌ॅपची झुमला टक्कर; 'हे' आहे फीचर्स

आगामी महिने हे देशांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ही वेळ आपण कोरोनाच्या लढ्यासाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रसार कमी टाळण्यासाठी देशाने कौतुकास्पद काम केल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

हेही वाचा-इंधनाचे दर कमी करण्याची वाहतूक संघटनेची मागणी

दरम्यान, ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोनाच्या लसीची मानवावर आजपासून चाचणी घेण्यात येणार आहे.

Last Updated : Apr 23, 2020, 10:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.