मुंबई - शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज ४०० अंशाची उसळी घेतली. ब्रेक्झिटमधील बदलाला कायदेशीररीत्या बंधनकारक करण्यास युरोपीयन आयोग आणि ब्रिटनने संमती दर्शवली आहे. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक पडसाद उमटले आहेत.
सकाळी शेअर बाजाराचा निर्देशांक ११ वाजून १२ मिनिटांना ३७,४९४ एवढा होता. सोमवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ३७,०५४ वर बंद झाला. निफ्टीनेही ११, २५० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. विदेशी वित्तीय संस्थांनी गुंतवणूक केल्यानेही शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. भारती एअरटेल, लार्सन अँड टुर्बो आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत. हिरो मोटोकॉर्प, इन्फोसिस, बजाज ऑटो आणि ओएनजीसीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन क्लाउड जंकर आणि पंतप्रधान थेरेसा यांनी बेक्झिटमधील बदलाबाबत गॅरंटी देण्याची तयारी दर्शवली आहे. या निर्णयानंतर आशियातील बहुतेक शेअर बाजारांच्या निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे.