ETV Bharat / business

Stock market: सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 17 600 च्या खाली सेन्सेक्स 200 अंकानी घसरला - बीएसई सेन्सेक्स

सुरुवातीच्या बाजारात बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 233.53 अंकावर किंवा 0.40 टक्क्यानी घसरुन 58,803.65 वर व्यापार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टी 73.70 अंक किंवा 0.42 टक्के घसरुन 17,543.45 वर आली.

Stock market
Stock market
author img

By

Published : Jan 24, 2022, 3:17 PM IST

मुंबई: विप्रो, बजाज फिनसर्व्ह आणि इन्फोसिस यांसारख्या मोठ्या समभागांमध्ये जागतिक बाजारातील मोठ्या प्रमाणात नकारात्मक ट्रेंडमध्ये घसरण झाली. त्यामुले प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात 200 अंकांवर घसरला. व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार, विदेशी निधीच्या सतत बाहेर पडण्याने देशांतर्गत शेअर बाजारांवरही (Stock market) दबाव आला.

सेन्सेकमध्ये सर्वाधिक 2.44 टक्क्यांनी घसरण ही एशियन पेंट्समध्ये झाली आहे. या व्यतिरिक्त टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फिनसर्व, इंफोसिस, एचसीएल टेक आणि बजाज फाइनेंस सुद्धा घसरण होणाऱ्या प्रमुख शेअर्समध्ये सहभागी होते. दुसऱ्या बाजूला पावरग्रिड, मारुती आयसीआयसीय बैंक, रिलायंस इंडस्ट्रीज आणि भारती एयरटेलमध्ये वाढ (Rise in Bharti Airtel) दिसून आली.

मागील सत्रात, सेन्सेक्स 427.44 अंक किंवा 0.72 टक्क्यांनी घसरून 59,037.18 वर बंद झाला, तर व्यापक NSE निफ्टी 139.85 अंक किंवा 0.79 टक्क्यांनी घसरून 17,617.15 वर बंद झाला. आशियाई बाजारांमध्ये हाँगकाँग, सोल आणि टोकियोच्या बाजारात घसरण झाली. तर शांघायमध्ये वाढ झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.92 टक्क्यांनी वाढून 88.70 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (foreign institutional investors) शुक्रवारी एकूण 3,148.58 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.