ETV Bharat / business

रिलायन्सला धक्का! फ्युचर ग्रुपबरोबरच्या 24,713 कोटींच्या सौद्याला 'सर्वोच्च' स्थगिती - रिलायन्स रिटेल फ्युचर ग्रुप

सिंगापूरमधील लवादाने रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील २४ हजार ७१३ कोटी रुपयांच्या सौद्याला स्थगिती दिली होती. या निकालाची अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.

मुकेश अंबानी जेफ बेझोस
मुकेश अंबानी जेफ बेझोस
author img

By

Published : Aug 6, 2021, 2:57 PM IST

नवी दिल्ली - किरकोळ बाजारात (रिटेल मार्केट) वर्चस्व प्रस्थापित करू पाहणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजला धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि रिलायन्स रिटेलच्या वादातील खटल्यात अॅमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. सिंगापूरच्या इमर्जन्सी आरबिट्रेटरने (ईए) फ्युचर रिटेल लि. कंपनीच्या रिलायन्स रिटेलमधील विलिनीकरणाला स्थगिती दिली होती. हा निकाल भारतासाठी वैध असून त्याची अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निकालात निरीक्षण नोंदविले.

फ्युचअर ग्रुप आणि रिलायन्स रिटेलमधील सौद्याबाबत कार्यवाही करावी, अशी ई-कॉमर्स अ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ॅमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सिंगापूरच्या लवादाने २४ हजार ७१३ कोटींच्या सौद्याला दिलेल्या स्थगितीवर विचार करावा, असे अॅमेझॉनने याचिकेत म्हटले आहे. यावरील निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने अॅमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. यापूर्वी सिंगापूरच्या लवादाने रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील सौद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या निकालाची प्रत अ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ॅमेझॉनने सेबीसह मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीलाही पाठविली आहे.

हेही वाचा-विरोधी पक्षांनी जंतर-मंतरकडे वळवला मोर्चा; शेतकरी आंदोलनात सहभागी

फ्युचर ग्रुपने रिलायन्सशी २४ हजार ७१३ कोटींचा सौदा करताना कराराचे उल्लंघन केल्याचा दावा करत अ‌ॅ‌‌‌‌मेझॉन कंपनीने सिंगापूरमधील लवादाकडे तक्रार केली होती. या लवादाच्या न्यायाधीशांनी अ‌ॅमेझॉनला तात्पुरता दिलासा देत रिलायन्सचा सौदा स्थगित करण्याचा निकाल दिला आहे.

हेही वाचा-जीडीपीचा विकास दर 7 टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो - नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी

हा आहे अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनचा आक्षेप-

अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनने फ्युचर ग्रुपची कंपनी फ्युचर कुपनमध्ये ४९ टक्के हिस्सा घेतला होता. त्यानुसार फ्युचर रिटेलचा हिस्सा घेताना ३ ते १० वर्षांपर्यंत अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनला प्राधान्य मिळावे, अशी करारात अट होती. फ्युचर कुपनचा फ्युचर रिटेलमध्ये ७.३ टक्के हिस्सा आहे. मात्र, फ्युचर ग्रुपने करार करत रिटेलचा घाऊक, किरकोळ व लॉजिस्टिक्सचा व्यवसाय रिलायन्सला दिला आहे.

रिलायन्स रिटेलमध्ये जागतिक कंपन्यांकडून गुंतवणूक

अद्याप, रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या व्यवहाराला भारतीय नियामक संस्थेकडून परवानगी मिळालेली नाही. रिलायन्स फ्युचर ग्रुप विकत घेतल्यानंतर जागतिक कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबादला, जीआयसी, टीपीजी आणि एडीआयए कंपन्यांनी ३७ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा-कोव्हिशिल्ड घेऊन परेदशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 कोटीचा निधी; असा करा अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.