ETV Bharat / business

रेपो दरातील बदलाप्रमाणे 'ही' बँक देणार गृहकर्ज; कर्जाचा हप्ता होणार कमी - repo rate

रेपो दरातील कपातीचा लाभ बँका ग्राहकांना देत नसल्याने आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नाराजी व्यक्त केली होती.

एसबीआय
author img

By

Published : Jun 8, 2019, 4:43 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करूनही बहुतेक बँका गृहकर्जाच्या हप्ता (ईएमआय) कमी करत नाहीत. हा लाभ मिळवून देणारी गृहकर्ज योजना देशातील सर्वात मोठी एसबीआय बँके १ जुलैपासून सुरू करणार आहे.

एसबीआयच्या नव्या गृहकर्ज योजनेत रेपो दरातील बदलाप्रमाणे कर्जाचा हप्ता बदलणार आहे. रेपो दराप्रमाणे कर्जाच्या हप्त्यात बदल करून गृहकर्ज योजना देणारी एसबीआय ही पहिली बँक ठरणार आहे. आरबीआयने १ लाखांहून अधिक मर्यादा असलेले कॅश क्रेडिट खाते आणि ओव्हर ड्राफ्टवरील व्याजदरात कपात केली आहे.

सध्या कॅश क्रेडिट कार्ड आणि ओव्हरड्राफ्ट काढणाऱ्या ग्राहकांना रेपो दराशी संलग्न कर्जाचा दर (आरएलएलआर) ८ टक्के आहे. आरबीआयने रेपो दरात २५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. या कपातीला लाभ ग्राहकांना १ जूलैपासून दिला जाणार असल्याचे एसबीआयने म्हटले आहे. रेपो दरातील कपातीचा लाभ बँका ग्राहकांना देत नसल्याने आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.